शासकीय मेडिकल कॉलेजच्या डीनच्या बदलीची करणार मागणी

खासदार विनायक राऊत यांची माहिती
Edited by: विनायक गावस
Published on: November 22, 2023 20:18 PM
views 216  views

सिंधुदुर्ग: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांच्या आडमुठ्या धोरणाच्या बऱ्याच तक्रारी आलेल्या आहेत. मागील महिन्यात बैठक करून देखील त्यात सुधारणा झालेली दिसत नाही. जिल्ह्यातून रूग्णांच्या गोवा-बांबोळी, कोल्हापूर फेऱ्या वाढलेल्या आहेत. याला सर्वस्वी जबाबदार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनच आहेत‌‌. ही परिस्थिती वरिष्ठांच लक्षात आणून देत त्यांची ताबडतोब बदली करा अशी मागणी करणार आहे.

रूग्णांच्या सातत्याने तक्रारी वाढत आहेत. आमचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री जस लक्ष सिंधुदुर्गवर देत होते तसं लक्ष आताचं सरकार देत नाही हे दुर्दैव आहे असं मत रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले आहे.