संतोष देशमुख हत्तेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी

Edited by:
Published on: January 03, 2025 20:00 PM
views 338  views

दोडामार्ग : बीड येथील संतोष देशमुख यांच्या हत्तेतील आरोपीना कठोरात कठोर शिक्षा द्या या मागणीसाठी ८ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच संघटना आपल्या कार्याल्या समोर धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना सरपंच संघटनेने दिले.

त्या निवेदनात म्हटले की संतोश देशमुख हत्तेतील आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सरपंच जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे. त्यामुळे सर्व सरपंचांच्या भावना आपण शासन स्तरावर पोहचवाव्यात अशी मागणी यावेळी सिंधुदुग सरपंच समघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.