ग्रंथालयांचे प्रलंबित सोडवण्याची मागणी...!

Edited by: विनायक गावस
Published on: October 29, 2023 14:29 PM
views 77  views

सावंतवाडी : ग्रंथालयांचे कित्येक वर्ष प्रलंबित असलेले अनेक प्रश्न मार्गी लावावेत. ग्रंथालयांना 60% अनुदानात वाढ दिलेली आहे. याचे सरकारचे निश्चितच आम्ही अभिनंदन करत आहोत‌. परंतु, सन 2012 पासून बंद असलेली नवीन ग्रंथालय मान्यता ग्रंथालयांचा दर्जा बदल फर्निचर आणि इमारत अनुदान पूर्व सुरू करण्यात यावे, ग्रंथालय कर्मचार्‍यांना किमान वेतन सेवाशर्ती लागू करण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के, सचिव राजन पांचाळ, संचालक ॲड. संतोष सावंत, भरत गावडे, विठ्ठल कदम आदींच्या शिष्टमंडळाने राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन दिले आहे.निश्चितपणे राज्य शासन ग्रंथालय चळवळ वाढीच्या दृष्टीने प्रलंबित समस्यांकडे निश्चितच लक्ष खालील असे आश्वासन श्री केसरकर यांनी शिष्टमंडळाला दिले.

सावंतवाडी येथे श्री केसरकर यांची सिन्नर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री मस्के व त्यांच्या पदाधिकारी संचालक यांनी भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालयातील समस्या अडचणी स्पष्ट केल्या व निवेदन सादर केले. त्यामध्ये ग्रंथालयांचे अनुदान तिप्पट वाढ करून कर्मचारी वेतन आंदोलन 100% द्यावे सन 2012 पासून बंद असलेले नवीन ग्रंथालय मान्यता व ग्रंथालयांचा दर्जा बदल फर्निचर आणि इमारत अनुदान पूर्व सुरू करण्यात यावे, ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान वेतन सेवाशर्ती लागू करण्यात याव्यात ग्रंथालय सेवकांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन योजना सुरू करण्यात यावी.

जिल्हा नियोजनमध्ये सार्वजनिक ग्रंथालय सक्षमीकरणासाठी संगणक फर्निचर संगणक सॉफ्टवेअर इत्यादींसाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी. ग्रामीण ग्रंथालयांना जिल्हा परिषद शाळांच्या इमारतीमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी कोमसापचे तालुका उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे प्राध्यापक रुपेश पाटील आदी उपस्थित होते.