
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय सुमारे ९ कोटी रुपयांची एम आर आय अत्याधुनिक मशीन तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व कणकवली उपजिल्हा रुग्णालयास 12 कोटी रुपयांची सिटीस्कॅन मशिनरी मिळण्याबाबत जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच लक्ष वेधले आहे. यासाठी जिल्हा नियोजनामार्फत निधी देऊन सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयामध्ये फक्त एक सिटीस्कॅन मशीन रुग्णांना अपघाताच्या वेळी तसेच वेगवेगळ्या रुग्णांचे आजाराचे निदान करण्यासाठी कार्यरत आहे. परंतु, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये तसेच कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे सिटीस्कॅन व एम आर आय मशीन नसल्याने खाजगीरित्या सुमारे 7000- 8000 हजार पर्यंत एमआयचा रिपोर्टची तसेच सिटी स्कॅन रिपोर्टसाठी रुग्णांना 3500 पर्यंत खाजगीरीत्या निदान करण्यास खर्च येतो. सर्वसामान्य व गोरगरीब रुग्ण व ज्येष्ठ नागरिक अंध अपंग कर्णबधिर व दारिद्र्यरेषेखालील रुग्णांना तसेच वीस हजारच्या आज उत्पन्नाचा दाखला तहसीलदारकडून दिल्या अशा रुग्णांना आपण जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने व आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असल्याने आपण या बाबीकडे प्राधान्याने आर्थिक निधी देऊन सर्वसाधारण गोरगरीब रुग्णांची सेवा करण्याची कार्य आपल्याला लाभणार आहे तसेच ही सेवा देणे तुम्हाला ईश्वरी सेवा देण्यासारखी आहे.यापूर्वी 2013 नोव्हेंबर पूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस पक्षाचे सरकार असताना सावंतवाडी राजवाडा येथे श्रीमती सत्वशीलादेवी भोसले यांना खाजगी कामासाठी भेट देण्यासाठी आले असताना मी महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांना ही सुविधा चालू असताना 28 जिल्ह्यांसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना 971 प्रकारची शस्त्रक्रिया व त्यावरील उपचार हे मोफत व्हावे म्हणून त्यांना निवेदन दिले होते.त्यावेळी एक महिन्याच्या आत त्यांनी गोरगरीब रुग्णांचा विचार करून त्यांनीही सुविधा 28 जिल्ह्यांना माझ्या निवेदनामुळे मंजूर करण्यात आली त्यामध्ये शस्त्रक्रिया औषधे व जेवण या सुविधांचा लाभ रुग्णांना मोफत होतो पिवळे केसरी रेशन कार्ड असलेल्या रुग्णांना मोफत होतो त्या योजनेचे नाव 2017 साली युती सरकारच्या काळामध्ये महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना या योजनेचे नावाने बदलण्यात आले.
त्यामुळे तश्या पद्धतीने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोरगरीब रुग्णांनसाठी महान कार्य केले होते तसेच तुम्ही माझ्या निवेदनाचा गोरगरीब रुग्णांना एमआरआय व सिटीस्कॅन मशिनरी निदान करण्यासाठी सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांची आर्थिक परिस्थिती नसते.तसेच गोवा बांबूळी हा हायवे असल्याने अनेक अपघात या जिल्हात मध्ये घडत असतात तसेच वेगवेगळ्या आजाराने गोरगरीब रुग्ण त्रस्त असतात त्यावेळी वैभववाडी देवगड येथील रुग्ण कणकवली उपजिल्हा रुग्णालय तसेच दोडामार्ग वेंगुर्ला येथील रुग्ण सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये व मालवण व कुडाळ येथील रुग्ण ओरोस जिल्हा रुग्णालयात मध्ये निदान करू शकतात निदान करते ही सुविधा प्राधान्याने संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांना याचा फायदा होऊ शकतो. एम आर आय मशीन व सिटी स्कॅन मशीन मिळाल्यास टेक्निशियन मार्फत मुंबई पुणे येथे शासकीय रुग्णालयामार्फत इंटरनेट द्वारे रुग्णांचा रिपोर्ट तज्ञ डॉक्टरांमार्फत मिळू शकतो अर्ध्या ते एक तासाच्या आत हा रिपोर्ट मिळू शकतो. तसेच साठ वर्षांवरील जेष्ठ नागरिक वीस हजारच्या आत उत्पन्नाचा दाखला तहसिलदार कार्यालयाकडुन दिल्यास व अंध अपंग मूकबधिर कर्णबधिर व मतिमंद तसेच पोलीस केसमधील अपघाती रुग्णांना सुद्धा दाखला दिल्यास सर्व रुग्णांना मोफत महाराष्ट्रामधील शासकीय रुग्णालयांमध्ये सेवा काँग्रेस पक्षाच्या कारकर्दी पासून आज पर्यंत चालू आहे या पद्धतीने सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना त्याचा फायदा व लाभ मिळू शकतो त्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांनी केली आहे.










