
बांदा : निगुडे तेलवाडी येथे सार्वजनिक विहीर असून या ठिकाणी अनेक लोक त्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करत आहेत. या विहिरीचा गाळ २०२२ - २०२३ मध्ये या विहिरीतील गाळ उपसा करून त्या ठिकाणी लोखंडी जाळी बसवण्याचे वित्त आयोगामध्ये तरतूद केलीआहे. मात्र, गेली दोन वर्षभर याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने पूर्णता दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दिलेल्या निवेदनात केला आहे. वारंवार निगुडे नळ पाणी योजनेच्या पाणीपुरवठा मध्ये बिघाड होत असल्यामुळे पिण्याचे स्त्रोत्र हे सार्वजनिक विहीर असून त्या ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याचं गुरुदास गवंडे यांनी सांगितलं आहे.
या विहिरीतील गाळ उपसा ०५ वर्षांपूर्वी करण्यात आला होता. त्याचप्रमाणे विहिरीमध्ये टीसीएल पावडर टाकली जात नसल्याचा आरोपही केला आहे. वारंवार ग्रामसभेमध्ये या संदर्भात आवाज उठवला जातो परंतु ग्रामपंचायत या गोष्टीकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गुरुदास गवंडे यांनी केला आहे. त्यामुळे निगुडे तेलवाडी ग्रामस्थ व माजी लोकप्रतिनिधी मंगळवार दि. ११ मार्च २०२५ रोजी सकाळी ठीक ०८:०० वाजता ग्रामपंचायत निगुडे येथे बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती गुरुदास गवंडे यांनी दिली आहे.
यासंदर्भात दि. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी ग्रामपंचायत प्रशासनाला पत्र देण्यात आल असल्याचा त्यांनी सांगितलं. हे पत्र माहितीसाठी मा. उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, सावंतवाडी,मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती ,सावंतवाडी तसेच मा. पोलीस निरीक्षक बांदा यांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे नियोजित उपोषण हे उद्या सकाळी ०८:०० वाजता होणार असल्याच निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी सांगितलेले आहे. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असेही त्यांनी म्हटले आहे.