
देवगड : देवगड मधील विविध संघटनांकडून कोलकत्ता,बदलापूर येथील घडलेल्या घृणास्पद घटनेच्या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षा योजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोलकत्ता येथे एका स्त्री डॉक्टर व बदलापूर येथे दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर आपल्या तालुक्यातील सर्व शाळा तसेच संबंधित क्षेत्रामध्ये योग्य ती खबरदारी देखरेख तसेच जागरुकता दाखवणे व मुलींच्या महिलांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी देवगड येथील शहर विकास ग्रामस्थ मंडळ,देवगड तालुका शिवसेना महिला संघटक,ह्यूमन राईट्स देवगड तालुका यांच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे देवगड तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक देवगड यांचे कडे देण्यात आले आहे.
या वेळी देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळ तसेच इंटरनॅशनल ह्यूमन राईट्स देवगड तालुका महिला अध्यक्षा शामल जोशी , इंटरनॅशनल ह्यूमन राईट्स तालुका अध्यक्ष श्याम कदम ,यांच्या समवेत विलास रूमडे विमल बलवान, जान्हवी नाथगोसावी, मधुरा तारीं,प्राची कोळंबकर,श्रुती करंदिकर, स्वाती बापट, वीणा इंदोलीकर, रेखा तावडे, शिवांगी भिडे, अरुणा पेठे, हर्षा ठाकूर, अनुजा जोशी दीक्षा तेली , दयानंद तेली संतोष पांचाळ, प्रकाश जाधव ,बाळा कणेरकर उपस्थित होते.
या निवेदनात नमूद केल्या प्रमाणे कोलकत्ता येथे एका स्त्री डॉक्टर व बदलापूर येथे एका शाळेतील दोन चिमुकली अल्पवयीन लहान मुलींवर अत्याचाराचा घृणास्पद प्रकार घडलेला आहे. या प्रकारामुळे सर्व महाराष्ट्र हादरला आहे. आपल्या देवगड तालुक्याचा विचार करायचा आहे. आपल्या तालुक्यातील शाळांचा लहान मुलांचे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य तो आढावा देखील सूचना देणे जातींची गरज निर्माण झालेली आहे. सुदर्शन घटनेनंतर महाराष्ट्र शासनाने सर्व शाळांना गावात विविध नियम सूचना जाहीर केले असेल त्याबाबतची माहिती आपणास शासनामार्फत प्राप्त होईल एक संघटना आपणास या नियोजनाने काही उपयोजना सुचवू इच्छिते या बाबत गंभीरपणे व तातडीने अंमलबजावणी अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. देवगड तालुक्याची विविध शाळांना भेटी घेणे शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कर्मचारी वर्ग मुलांची निवड करण्यात वाहने तसेच कर्मचारी वाहन चालक यांच्या नोंदी बाबत परीक्षण देशमुख ठेवणे मुलांची नियम जाणारी वाहने त्याची कायदेशीर कागदपत्रे ओळखपत्रे त्यांची तपासणीच्या व दैनंदिन रजिस्टर ठेवणे व सूचना करण्यात याव्यात शाळांमध्ये शासनाच्या नवीन अटी प्रमाणे शासन निर्णयाच्या तारखेपासून एक महिन्याच्या शाळा व परिसर सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक आहे. या चर्चेचे पालन केले संबंधित शासन अनुदान रोखणे मान्यता रद्द करणे असे स्पष्ट नमूद केले आहे त्यामुळे संबंधित शाळांमध्ये सगळ्या अटीचे पालन झाले किंवा नाही याबाबत पाहणी देखील करणे सखी सावित्री समिती स्थापन केली आहे. याबाबत पाहणी करणे शाळा कॉलेज परिसरात रस्त्यावर फिरणाऱ्या रोड रोमिओ वर कारवाई करणे ,सुरक्षेसाठी तातडीने पोलीस तैनात करणे, देवगड शहरातील सीसीटिव्ही कॅमेरे सुस्थितीत ठेवण्यात यावेत. महिला मुलांची सुरक्षेसाठी साठी आपले पोलीस स्टेशनला स्वतंत्र कक्ष सुरू करणेसहभागी केलेल्या उपायोजना आपणास आहे. या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात मागणीही करण्यात आली आहे या निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, पोलीस उपाधीक्षक कणकवली पालकमंत्री महाराष्ट्र राज्य यांना रवाना करण्यात आल्या आहेत.