
दोडामार्ग : गेली चाळीस वर्षे राजकारण आणि समाजकारणात सक्रिय असलेले आणि आडाळी एमआयडीसी उभारणीत महत्वाचे योगदान दिलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांना भाजपने विधानसभेची उमेदवारी द्यावी,अशी मागणी भाजपचे प्रवीण गांवकर यांनी केली आहें. गांवकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहें की, गेली चाळीसहून अधिक वर्षे एकनाथ नाडकर्णी हे राजकारण आणि समाजकारणात आहेत.
सुरवातीला शिवसेना वं नंतर काँग्रेस पक्षात वं आता भाजपात काम करत असताना आपल्या पदांचा उपयोग जनतेच्या हितासाठी कसा होईल याचाच अधिक विचार त्यांनी केला आहें. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम करताना त्यांनी दोडामार्गसह सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यातही दांडगा जनसंपर्क ठेवला होता. कळणे खनिज प्रकल्प विरोधात लढताना त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. काँग्रेस मध्ये प्रवेश करताना त्यांनी दोडामार्ग तालुक्याच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी तालुक्यात एमआयडीसी आणण्याची मागणी नारायण राणेंकडे केली. त्यानुसार आडाळीत एमआयडीसी प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यानंतर प्रत्यक्ष प्रकल्प उभा रहावा म्हणून सातत्याने पाठपुरावा करतं आहेत. त्यामुळे आता भविष्यात दोडामार्ग - बांदा परिसरातील हजारो तरुणांना आडाळीत रोजगार संधी निर्माण होणारं आहेत. जिल्हा परिषद सदस्य वं उपाध्यक्ष असताना श्री. नाडकर्णी यांच्या माध्यमातून कोट्यावधीची विकासकामे तालुक्यात झाली.रोजगारासाठी गोव्यात जाणाऱ्या नागरिकांना जवळचा वं सोईचा रस्ता व्हावा म्हणून कळणे करमळी रस्त्यावर त्यांनी पूल बांधून घेतला. त्याचा फायदा आता शेकडो नागरिकांना रोजच्या येण्याजाण्यासाठी होत आहे
अशाप्रकारची दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वावर येथील जनतेचाही विश्वास आहे. तसेच व्यक्तिगत कामांसाठी देखील नागरिक नाडकर्णी यांच्या संपर्कात असतात. सामाजिक, क्रीडा वं धार्मिक, सांस्कृतिक उपक्रमात नाडकर्णी यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यामुळे जनतेमध्ये त्यांची लोकप्रियता आहें. शिवसेना, काँग्रेस वं आता भाजपा या तिन्ही पक्षातील ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क आहें. शिवाय उमेदवारी मिळाल्यास दोडामार्ग, बांदा परिसर एकसंघपणे त्यांच्या मागे राहू शकतो. शिवाय एवढ्या वर्षात दोडामार्गला स्थानिक आमदार मिळालेला नाहीं. तीही कसर नाडकर्णी यांच्या रुपाने भरून निघू शकते. त्यामुळे आगामी विधामसभा निवडणुकीत भाजपाने नाडकर्णी यांना उमेदवारी द्यावी. तशी मागणी आम्ही पक्षाच्या नेतृवाकडे करणार आहोत.