मळगाव इंग्लिश स्कूलच्या समोर गतिरोधकाची मागणी

Edited by: विनायाक गावस
Published on: June 23, 2023 19:34 PM
views 90  views

सावंतवाडी : सावंतवाडीतील मळगाव ह्या गावातील बाजारपेठेत (रस्तावाडी) शाळेतील मुलांची, कामासाठी आलेल्या लोकांची गर्दी ही भरपुर प्रमाणात असते त्यात टू व्हीलर, फोर व्हीलरचा, डंपर इ. ची वाहतुक मोठ्या प्रमाणात असते.

मळगाव : नेमळे रोडवर मळगावात रस्तावाडीत मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव ही मोठ्या प्रमाणात मुल असणारी शाळा आहे या शाळेत ७०० च्या वर मुल शिक्षणासाठी मळेवाड, न्हावेली, सोनुर्ली, नेमळे, मळगाव, वेत्ये, निरवडे- कोनापाल या गावातुन येतात त्यात मळगाव व बाहेरील गावातील लोकांची आणि गाड्याची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे लहान मोठ्या अपघात चे प्रमाण वाढत चालले आहे. कालच गुरूवार २२ जून२०२३ धुम स्टाईल टू व्हीलरने एका शाळेतल्या १३ वर्षीय मुलीला ठोकरून अपघात झाला त्या आधी असे बरेच अपघात झाले. अशा वारंवार होणाऱ्या अपघातामुळे मळगाव (रस्तावाडी) बाजारपेठेत मळगाव- नेमळा रोडवर मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव या शाळेच्या समोरील रस्त्यावर गतिरोधक घालणे अत्यंत महत्त्वाचे आहेत.

मळगाव इंग्लिश स्कूल च्या समोरच्या रस्त्यावर गतिरोधक लवकरात लवकर नाही घातल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना गावातील लोकांना घेऊन जन आक्रोश आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला.

यावेळी निवेदन देण्यास गेल्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी चव्हाण सुट्टीवर असल्या कारणाने उप कार्यकारी अभियंता गोवेकर यांनी निवेदन स्विकारले.

त्यावेळी मनसेचे पदाधिकारी सुधीर राऊळ, राकेश परब, जय राऊळ, केतन सावंत, ओमकार नवार, प्रसाद सामंत, आदित्य राऊळ, सिध्देश सावंत इ. उपस्थित होते.