
देवगड : क्षेत्र कुणकेश्वर मंदिर येथे श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि श्री कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबई ग्रामस्थ कुणकेश्वर यांच्या वतीने प्रतिवर्षी दिपावली पाडवा दीपोत्सव साजरा करण्यात येतो. या दीपोत्सव कार्यक्रमादरम्यान असंख्य भाविक सहभागी होत असतात. यावर्षीचा दीपोत्सव दि. २६ ऑक्टोबर २०२२ रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त मंदिर व मंदिर परिसरामध्ये अकरा हजार दिव्यांची आरास होणार असुन विविध प्रकारच्या रांगोळ्या साकारल्या जाणार आहेत. यासाठी सर्व रांगोळी कलाकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
यादिवशी सायंकाळी ०६:०० ते ०८:३० या वेळेमध्ये 'स्वर निषाद' मुंबई हा साज संगीताचा कार्यक्रम सादर होणार असुन त्याचे मुख्य संकलन हेमंत कुमार तवटे यांचे असुन यात गायक जयेश तेंडुलकर आकाश नकाशे गायिका मान्यता कुंटे आणि इंडियन आयडल फेम गणेश मेस्त्री सहभागी होणार आहेत. या संगीत मैफिलीचे निवेदन राजा सामंत हे करणार आहेत. दरम्यान सायंकाळी ०६:३० वाजता मंदिरामध्ये मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होताच मंदिर व परिसरातील दिप उजळले जाणार आहेत. त्यामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे सर्व भाविक भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्ट वतीने करण्यात येत आहे. तसेच रात्रौ ०८:३० ते ०९:०० वाजता सन्मान सोहळा व त्यानंतर ०९:०० ते ०९:३० पालखी प्रदक्षिणा सोहळा होणार आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी या कर्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे.यावेळी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अध्यक्ष संतोष लब्धे, सचिव शरद वाळके, खजिनदार अभय पेडणेकर, उपाध्यक्ष दिनेश धुवाळी,सरपंच चद्रकांत घाडी , अजय नानेरकर, संजय आचरेकर, संतोष लाड,व विश्वस्त आदी उपस्थित होते.