दीपकभाई, सांगतील ती पूर्व दिशा, कार्यकर्त्यांची भावना

राणेंसाठी पिंजून काढला मतदारसंघ !
Edited by: विनायक गांवस
Published on: May 04, 2024 08:11 AM
views 210  views

सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला तालुक्यासह मतदारसंघ पिंजून काढत त्यांनी राणेंना मोठं मताधिक्य मिळवून देण्याचा चंग बांधला आहे. शुक्रवारी सावंतवाडी शहरात रात्री उशीरापर्यंत मंत्री केसरकर यांनी कॉर्नर बैठकांवर भर दिला. विकासाच्या आड येणाऱ्या नको, तर विकासाला साथ देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या पाठीशी उभे रहा असं आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी केल.  

सावंतवाडी शहरात ठिकठिकाणी मंत्री दीपक केसरकर यांनी कॉर्नर बैठक घेतल्या. यावेळी नारायण राणेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केलं. याप्रसंगी दीपक केसरकर हाच आमचा पक्ष आहे. आमच त्यांच्यावर व त्यांच आमच्यावर असणार प्रेम हेच त्यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे दीपक केसरकर सांगितील तीच आमच्यासाठी पूर्व दिशा असेल अशा भावना माजी नगरसेवक गोविंद वाडकर यांनी व्यक्त केल्या. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणच्या विकासासाठी दिलेलं योगदान पहाता त्यांना मोठ्या मताधिक्यान नं विजयी करू अस ते म्हणाले. सावंतवाडी शहरातील सबनीस वाडा, खासकीलवाडा, समाजमंदिर, सर्वोदयनगर, सालईवाडा परिसरात मंत्री दीपक केसरकर यांच्या या बैठका झाल्या. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख बाबु कुडतरकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, सुरेंद्र बांदेकर, गोविंद वाडकर, माधुरी वाडकर, भारती मोरे, प्रतिक बांदेकर, नंदू शिरोडकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.