
वेंगुर्ला : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सिंधुदूर्ग, (MTDC) प्रकल्प अधिकारी पदी दिपक माने यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद चे माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले. यावेळी सोबत भाजप रेडी विभाग प्रमुख महादेव गावडे, भुषण सांरग, गोपाळ राऊळ आदी उपस्थित होते. या अगोदर त्यांनी २०११ ते २०१२ मध्ये सिंधुदुर्ग मध्ये काम केले होते.