दीपक केसरकरांकडून मंत्री नितेश राणेंचे अभिष्टचिंतन

Edited by: विनायक गांवस
Published on: June 22, 2025 20:15 PM
views 152  views

सावंतवाडी  : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले. 

यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर हे देखील उपस्थित होते. मंत्री नितेश राणे यांचा सोमवार २३ जून रोजी वाढदिवस असून ते सोमवारी जिल्हा दौऱ्यावर आहेत. कणकवली येथील निवासस्थानी ते शुभेच्छा स्वीकारणार आहेत. या पार्श्वभूमीवर वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांच्या मुंबई जूहू येथील अधिश बंगल्यावर भेट घेत आमदार दीपक केसरकर यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.