वेंगुर्ल्यात दीपक केसरकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

वेंगुर्ला शहर शिवसेनेच्यावतीने आयोजन
Edited by: दिपेश परब
Published on: July 18, 2023 20:36 PM
views 70  views

वेंगुर्ला : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले शहर शिवसेनेतर्फे  खुल्या हाँलीबाँल स्पर्धा, औषधी व सावली देणाऱ्या वनस्पतींची लागवड आणि दीपक केसरकर यांना दिर्घायुष्य व चांगले आरोग्य लाभावे यासाठी मंदिरात लघुरुद्र असे उपक्रम घेण्यात आले. 


     महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले शहर शिवसेनेतर्फे आज १८ जुलै रोजी सकाळी खुल्या हाँलीबाँल स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेचे उदघाटन वेंगुर्ला मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून करण्यात आले.  यावेळी उदघाटन प्रसंगी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर जिल्हा संघटक सुनील डुबळे व शहर प्रमुख उमेश येरम व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी महिला शहर संघटक श्रद्धा बाविस्कर परब, महिला अल्पसंख्याक संघटक शबाना शेख, वेंगुर्ला हायस्कूल मुख्याध्यापक कांबळी, आडेली ग्रामपंचायत सदस्य सुधीर धुरी, प्रा. हेमंत गावडे, स्पर्धा नियोजक सँमसन फर्नांडिस, बबलू कुबल आदी उपस्थित होते. या स्पर्धेत वेंगुर्ला, सावंतवाडी, फोंडा, रत्नागिरी, गोवा येथील एकूण २० निमंत्रीत संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेतील विजेत्यास रोख रुपये १० हजार व उपविजेत्यास रोख रुपये ७ हजार आणि कायमस्वरूपी आकर्षक चषक, तसेच अन्य आकर्षक बक्षिसे वितरीत केली जाणार आहेत.


    यानंतर सकाळी  वेंगुर्ले नगर परीषद भाजी मंडईतील शेकडो वर्षाच्या हनुमान मंदिरात दिपक केसरकर यांना चांगले आरोग्य व दिर्घायुष्य लाभण्यासाठी लघुरुद्र पुरोहितांमार्फत करण्यात आले. यावेळी सर्व नागरिकांना गोड पदार्थांचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. यानंतर

शहरातील जि.प. शाळा नं. ४ आणि वेंगुर्ले कँम्प भागात  औषधी व सावली देणाऱ्या कडूनिंब व बदाम झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. तर शिष्यवृत्ती परीक्षेत संपूर्ण तालुक्यातून प्रथम ३ क्रमांक आलेल्या मुलांपैकी शाळा नं ४ च्या २ विद्यार्थ्यांचा यावेळी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी लहान मुलांना मिठाई वाटप करून दीपक केसरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.