
सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री व महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. केसरकरांच्या होमपीचवर 'महायुती'नं आपली ताकद दाखवून दिली. केसरकर यांच्या घरापासून सुरू झालेली रॅली शिवउद्यान, बाजारपेठ करत बाहेरचावाडा येथे समाप्त झाली.
यावेळी येऊन येऊन येणार कोण दीपकभाईं शिवाय आहे कोण ! अशा घोषणा देण्यात आल्या. श्री. केसरकर भरघोस मतांनी विजयी होतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला गेला. या प्रचार रॅलीस महायुतीचे उमेदवार उमेदवार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक संजू परब,राष्ट्रवादीचे सुरेश गवस, भाजपचे माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, अजय गोंदावळे, बाळा गावडे, मोहीनी मडगावकर, तालुकाप्रमुख नारायण राणे, बाबु कुडतरकर, अँड. निता कविटकर, भारती मोरे, किरण नाटेकर, दिपाली सावंत, उत्कर्षा सासोलकर, शर्वरी धारगळकर, सुरेंद्र बांदेकर, परिक्षीत मांजरेकर, संतोष गांवस, आगस्तिन फर्नांडिस, अशोक पवार, देव्या सुर्याजी, शांताराम वेतोरकर, राघवेंद्र चितारी,युवा सेनेचे पदाधिकारी प्रतीक बांदेकर, कौस्तुभ गावडे, प्रथमेश प्रभू, पंकज बिद्रे, विनोद सावंत, सत्यवान बांदेकर आदींसह महायुतीचे महिला, युवा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.