केसरकरांच्या विजयासाठी माय - लेकी सरसावल्या...!

होमपीचवर बॅटिंग, 'चौकारा'चा विश्वास
Edited by:
Published on: November 18, 2024 15:33 PM
views 191  views

सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विजयासाठी त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा सौ पल्लवी केसरकर व सुकन्या सौ. सोनाली केसरकर-वगळ यांनी कंबर कसली आहे. मंत्री केसरकरांच्या होमपिचवर माय लेकींकडून जोरदार बॅटींग करण्यात आली असून विजयाचा 'चौकार' ठोकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

शहरातील सर्व प्रभागात दीपक केसरकर यांचा झंझावाती प्रचार करण्यात आला. माजी नगराध्यक्षा सौ पल्लवी केसरकर व सुकन्या सौ. सोनाली केसरकर-वगळ यांनी प्रचारात आघाडी घेतली. श्री. केसरकर हे विजयाचा चौकार मारतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सालईवाडा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सून वृषाली शिंदे, शिवसेना नेत्या शितल म्हात्रे आदींच्या उपस्थितीत कॉर्नर सभा घेण्यात आली. यानंतर आंबेडकर नगर, वैश्यवाडा, सबनिसवाडा, माठेवाडा, भटवाडी आदींसह शहरातली प्रमुख ठिकाणी झंझावाती प्रचार करण्यात आला. महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी या ठिकाणी उपस्थित राहत विरोधकांना जागा दाखवून द्या असे आवाहन केले.