
दोडामार्ग : विधानसभा निवडणुकीला अवघे 2 दिवस राहिले असून दोडामार्ग महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून दीपक केसकर यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. कोलझर पंचायत समिती मतदार संघात घर टू घर महायुती सरकारच्या योजना सांगून प्रचार केला जातं आहे.
कोलझर पंचायत समिती मतदार संघात कोलझर उपसरपंच समिधा समीर गवस व त्यांच्या सोबत पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने प्रचाराल फिरत आहेत. मतदार संघात फिरताना महायुती सरकारच्या योजना खास महिलांसाठी देण्यात येणाऱ्या लडकी बहीण योजना अशा अनेक योजना महायुती सरकारच्या माध्यमातून मिळाल्या आहेत. दीपक केसकर यांच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यात अनेक विकास कामे झाली असून अजूनही विकास कामे युतीच्या माध्यमातून केल्या जातील असा विश्वास पदाधिकाऱ्यांकडून मतदाराला दिला जात आहे. त्यामुळे महिला व जनतेतून प्रचाराला फिरताना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे मयुतीचाच विजय निश्चित असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.