
...तर उमेदवार संजू परब असते !
सावंतवाडी : सोनाली, माझी राजकीय वारसदार नाही. माझ्या सामाजिक कार्याची ती वारसदार आहे. आमच्या कुटुंबान हा वारसा जपला आहे. संजू परब पाच वर्षांपूर्वी सोबत येणार होते. कदाचित ते आज उमेदवार असू शकले असते. आता ते सोबत आले आहेत. इथे प्रत्येकाला संधी आहे. राजकीय वारस घोषित करायला मला परंपरागत राजकीय वारसा नाही. ही माझी शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे माझा वारसदार हा तयार झाला पाहिजे. तो माझा नाही तर पक्षाचा वारसदार असेल. शिवसेना, भाजप वा कोणत्या पक्षाचा असेल हा निर्णय वरिष्ठ घेतील अस मोठं विधान महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज केले. आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी यावर भाष्य केलं.
ते म्हणाले, सुरज परबने काय ठरवलं ? याची कल्पना नाही. मात्र, सोनाली माझी राजकीय वारसदार नाही. माझ्या सामाजिक कार्याची ती वारसदार आहे. आमच्या कुटुंबान हा वारसा जपला आहे. थेट राजकारणात असणारा मी एकटा असून बाकी कोणीही राजकारणात नाही. माझ्या मुलीच्या कार्याचा फायदा गोरगरीबांच्या हितासाठी व्हावा असं मला वाटतं. माझ्या सोबत संजू परब देखील आले आहेत. याआधी ते सोबत येणार होते. ते देखील आमदारकीसाठी इच्छुक आहेत. राजकारणात सक्रीय आहेत. त्यामुळे मागे निर्णय घेतला होता की पुढची निवडणूक लढणार नाही. कदाचित ते आज उमेदवार असू शकले असते. आज ते सोबत आले आहेत. इथे प्रत्येकाला संधी आहे. राजकीय वारस घोषित करायला मला परंपरागत राजकीय वारसा नाही. मला सामाजिक वारसा होता. त्या माध्यमातून मी राजकारणात आलो. त्याचा फायदा गोरगरीब जनता, महिला, युवकांसाठी केला. ही माझी शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे माझा वारसदार तयार झाला पाहिजे. तो माझा नाही तर पक्षाचा वारसदार असेल. शिवसेना, भाजप वा कोणत्या पक्षाचा असेल हा निर्णय वरिष्ठ घेतील. त्यावेळीच्या परिस्थितीनुसार ठरणार उमेदवार हाच वारसदार असेल असे विधान श्री. केसरकर यांनी केले
. तर सोनाली ही सामाजिक कार्य करेल. भारतातील सर्वोत्कृष्ट उद्योजक बनेल असा मला विश्वास आहे. ती भारतामध्ये पहिली आलेली आहे. पर्यटनाच्या माध्यमातून कोकणात हजारो मुलांना काम करण्याची संधी ती देऊ शकेल. राजकीय वारसा हा माझ्यासारख निस्वार्थीपणे काम करेल त्याला पक्षाकडून मिळेल. सोनाली आणि सुरजची राजकारणापेक्षा सामाजिक बांधिलकी अधिक आहे असे श्री. केसरकर यांनी सांगितले. यावेळी सौ. सोनाली केसरकर-वगळ, सुरज परब, अशोक दळवी आदी उपस्थित होते.