दीपक केसरकर चौथ्यांदा आमदार होणार, शिवसैनिकांचा विश्वास

समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा
Edited by: विनायक गांवस
Published on: July 18, 2024 07:54 AM
views 249  views

सावंतवाडी : राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस दीपकभाई मित्रमंडळ व शिवसैनिकांच्या वतीनं उत्साहात साजरा करण्यात आला. विविध सामाजिक उपक्रमांसह केक कापून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहत मंत्री दीपक केसरकर यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या‌.

दीपक केसरकर यांच्या कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. विविध सामाजिक उपक्रम दीपकभाई मित्रमंडळ व शिवसैनिकांच्या वतीनं मतदारसंघात राबविण्यात आले. मंत्री दीपक केसरकर यांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहत कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या‌. कार्यकर्ते, जनतेच मिळणार प्रेम मला काम करण्याच बळ देत अशी भावना मंत्री केसरकर यांनी याप्रसंगी व्यक्त केली. शुभेच्छा देणाऱ्या कार्यकर्ते, जनतेचे त्यांनी ऋण व्यक्त केले‌. यावेळ उपस्थितांकडून दीपक केसरकर यांना दीर्घायुष्य लाभो अशा सदिच्छा दिल्या. तर  सावंतवाडीतून दीपक केसरकर चौथ्यांदा आमदार होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.


याप्रसंगी गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात आली‌. तसेच समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देव्या सुर्याजी, सुधीर पराडकर, बाबल आल्मेडा, राजन निब्रे, ओंकार पराडकर, तुषार विचारे, संजय पेडणेकर, रवी जाधव, दिलीप राऊळ, मारूती निरवडेकर, अर्जून पेडणेकर आदींचा वृक्ष देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, महिला जिल्हाप्रमुख अँड. नीता सावंत, महिला शहर प्रमुख भारती मोरे, माजी नगराध्यक्ष अनारोजीन लोबो, सुरेंद्र बांदेकर दिपाली सावंत, शुभांगी सुकी गुणाजी गावडे, दत्ता सावंत, राजन रेडकर, प्रेमानंद देसाई, , सुजित कोरगावकर, आबा केसरकर, नंदू शिरोडकर, गजानन नाटेकर, शैलैश मेस्त्री, किर्ती बोंद्रे,  शिप्रा सावंत, अर्चना पांगम आदींसह पदाधिकारी,  कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.