
सावंतवाडी : कृष्णकृत्य करणारी लोकं इथे येऊन असं भासवतात की आपण कुणीतरी सज्जन आहोत. या लोकांना मी जेलमध्ये बघितले आहे. खुनाच्या आरोपाखाली बघितले आहे असा जोरदार पलटवार मंत्री दीपक केसरकर यांनी माजी आमदार राजन तेली यांच नाव न घेता हाणला आहे. तेलींनी केलेल्या टीकेला केसरकरांनी परखड शब्दात प्रत्युत्तर दिले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, भ्रष्टाचारी लोकांमुळे बंद पडलेले प्रकल्प मी आज पुन्हा सुरू करू शकलो याचा आनंद आहे. शिरशिंगे धरणाचा जीआर देखील निघाला आहे. कृष्णकृत्य करणारी लोकं इथे येऊन असं भासवतात की आपण कुणीतरी सज्जन आहोत. या लोकांना मी जेलमध्ये बघितले आहे. खुनाच्या आरोपाखाली बघितले आहे. माझ्या सभ्यतेच्या मर्यादा असल्याने मी गप्प बसतो, याचा फायदा घेऊ नये. मला विरोध करतात त्यांच्याविषयी मला प्रेम आहे. त्यांना काय हवं ते सांगितले पाहिजे तर मी करू शकतो. माझी बांधिलकी ही जनतेशी आहे असं मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.