
सावंतवाडी : येथील मतदारसंघातील जनतेचा महाविकास आघाडीला मिळणार्या उस्फूर्त प्रतिसादामुळे दीपक केसरकारांसह महायुतीच्या नेत्यांची पळापळ सुरू झाली आहे. तर आडाळी एमआयडीसीत पाचशे नको, पाच कारखाने आणून दाखवा असे आव्हान राणेंना आहे.तुम्ही मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री असताना जमले नाही ते आता काय जमणार ? असा सवाल करत केसरकारांसाठी येथील जनतेला फसवू नका असा टोला महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी हाणला.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, अँड. दिलीप नार्वेकर,संदीप निंबाळकर, राजू मसूरकर,जावेद शेख, विशाल जाधव, दादा पडवेकर,तौसीफ आगा, हमीद शेख, इलाय आगा यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावंतवाडी शहरातील झिरंगवाडी परिसरात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत आपण यापुढे तेली यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही दिली. महाविकास आघाडीचे राजन तेली हे कार्यसम्राट उमेदवार आहेत. यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेक जनतेचे प्रश्न मार्गी लावले आहेत कायम जनतेत राहून काम करणारा उमेदवार आपल्याला मिळाला आहे
त्यामुळे ज्यांनी या मतदारसंघाचा विकास रखडवला स्वताची प्रॉपर्टी वाढविली आणि आपण जमीन विकून निवडणूक लढवितो असे सांगून लोकांची दिशाभूल करताना केसरकर यांना लाज कशी काय नाही वाटत. त्यामुळे अशा निष्क्रिय आणि खोटारड्या उमेदवाराला घरी बसवा या ठिकाणी हिंदू मुस्लिम गुण्या गोविंदाने नांदत असताना काही जणांकडून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र तुम्ही कोणीही घाबरून जाऊ नका काहीही झाले तरी हिंदू मुस्लिम या ठिकाणी एकत्रच राहतील असा विश्वास व्यक्त करत मशाल चिन्ह समोर बटन दाबून तेली यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे उपस्थित महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.