दीपक केसरकर यांनी स्वामी समर्थांच्या पादुकांचे घेतले दर्शन...!

Edited by:
Published on: April 21, 2024 10:51 AM
views 237  views

सावंतवाडी : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कोलगाव-निरुखे येथे आलेल्या श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेतले. युवा कार्यकर्ते अनिकेत आसोलकर यांच्या निवासस्थानी संत चोळाप्पा महाराजांचे चौथे वंशज योगेंद्र पुजारी यांनी ह्या पादुका आणल्या होत्या. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडी दौर्‍यावर असलेल्या दीपक केसरकर यांनी स्वामी पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे आसोलकर कुटुंबीयांकडून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी अनिल आसोलकर, अमित आसोलकर, अमरेश आसोलकर, राघवेंद्र चितारी, चैतन्य सावंत, किसन धोत्रे, अभिषेक लाखे आदी उपस्थित होते. यावेळी योगेंद्र पुजारी यांच्याहस्ते दीपक केसरकर यांना स्वामींची मुर्ती व प्रसाद देवून सत्कार करण्यात आला.