तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला शिक्षणमंत्र्यांची भेट

Edited by: विनायक गावस
Published on: December 05, 2023 16:30 PM
views 303  views

सावंतवाडी: जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती वेंगुर्ले यांच्यावतीने ५१ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली. शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेली विविध उपकरणे कौतुकास्पद आहेत. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला योग्य मार्गदर्शन मिळाल्यास आपले विद्यार्थी खूप मोठी भरारी घेऊ शकतात याची प्रचीती आज पुन्हा एकदा अनुभवता आली. चांद्रयान तीन ची प्रतिकृती, वीज निर्मिती अशा वेगवेगळ्या उपकरणांनी सज्ज असलेले हे प्रदर्शन भारावून सोडणारे आहे असं मत मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केल. या निमित्ताने प्रदर्शनामध्ये सहभागी विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधत कौतुक केले.