दीपक केसरकरांनी शिरोड्यात घेतले घरगुती गणपतींचे दर्शन !

Edited by: दिपेश परब
Published on: September 24, 2023 16:45 PM
views 221  views

वेंगुर्ले : शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांनी शिरोडा येथे घरघुती गणपतींचे दर्शन घेतले. येथील देवेंद्र रेडकर व कुटुंबीय, दिलीप मठकर, पं स माजी सदस्य उमा मठकर व कुटुंबीय यांच्या घरी विराजमान गणरायाचे दर्शन घेतले. तर येथील विश्वनाथ परब यांच्या घरी भेट दिली.

यावेळी शिवसेना जिल्हा संघटक सुनील डुबळे, शिरोडा ग्रामपंचायत माजी सदस्य कौशिक परब आदी उपस्थित होते.