मंत्री केसरकरांच्या सूचनेनुसार लोटांगणाचा मार्ग स्वच्छ !

Edited by: विनायक गावस
Published on: November 28, 2023 11:08 AM
views 126  views

सावंतवाडी : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सोनुर्ली जत्रोत्सव मंदिर परिसराला भेट दिली. या परिसरातील लोटांगणासाठी जो मार्ग असतो तो चिखलमय झाल्याच त्यांचा निदर्शनास आलं. या मार्गावर चिखलमय परिसर स्वच्छ सुंदर करून भाविकांना लोटांगणासाठी सुलभ व्हावे या दृष्टीने तात्काळ आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना करून लोटांगणाचा परिसर भाग व मार्ग सुरळीत करून चिखलमय भागातून सुटका केली आहे.

शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते परशुराम चलवाडी यांनी केसरकर यांच्या सूचनेनुसार हा परिसर स्वच्छ केला. लोटांगणाच्या परिसर भागात वाळू व मातीचा थर टाकून तो भाग स्वच्छ करण्यात आला आहे. त्यामुळे भक्तांना आता सुलभ आणि चांगल्या पद्धतीत सोनुर्ली जत्रोत्सवाचा आनंद घेता येणार आहे असे शिवसेनेचे तथा माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी स्पष्ट केले.