केसरकर - राणे भेटीनंतर राजकीय समीकरणं बदलतील ?

Edited by: भरत केसरकर
Published on: December 02, 2023 17:51 PM
views 373  views

सिंधुदुर्ग : शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भेटीने कोकणातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 12 ते 13 वर्षाचा केसरकर आणि राणे यांच्यातील संघर्षाचा वनवास अखेर संपला आहे. यापुढे कोकणच्या विकासात आपण एकमेकांसोबत असो त्याचबरोबर यापूर्वी आमचा जो वाद होता तो वैचारिक वाद होता तो आता संपलाय अशी पुष्टी ही दोघांनी जोडली आहे. केसरकर- राणे यांच्या दिलजमाईमुळे कोकणातील आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे .मागील आठवड्यात दीपक केसरकर यांनी कणकवलीतील ओम गणेश बंगल्यावर जात नारायण राणेंची भेट घेतली आणी या दोघांतील राजकीय विरोधाला अखेर कायमचा पूर्णविराम मिळाला. का घेतली दीपक केसरकर यांनी भेट? यावरच राजकीय गुपित नेमक काय? यावर प्रकाशझोत टाकणारा हा लेख.

       सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यातील संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिलाय. 2012 पासून या संघर्षाला सुरुवात झाली. 2012 पूर्वी राणे आणि केसरकर हे गुण्या गोविंदाने नांदत होते. मात्र 2009 मध्ये सर्वप्रथम दीपक केसरकर हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले आणि त्यानंतर केसरकर आणि  राणे यांच्यातील संघर्षाला सुरुवात झाली. हा संघर्ष एवढा टोकाला पोहोचला की एकमेकांची जुनीच नव्हे तर एकमेकांवर टीकाटिपणी करण्याची एकही संधी दोघांनी सोडली नव्हती. केसरकर यांनी तर राण्यांच्या उल्लेख नरकासुर असा केला होता. नरकासुर दहन झालं अशा पद्धतीची टीका दीपक केसरकर यांनी केल्याने राणे यांच्या सुद्धा ते जिव्हारी लागल होतं. राणेंनी प्रत्येक कार्यक्रमात केसरकरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. राजाच्या राजकारणातील समीकरण दोन वर्षांपूर्वी बदलली. दीपक केसरकर हे शिंदे गटात दाखल झाले आणि भाजप आणि शिंदे गटाच्या युतीमुळे राणे केसरकर कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेलं होतं. मध्यंतरीच्या काळात दीपक केसरकर यांनी आपला राणीन सोबतचा संघर्ष आता संपलाय अशा पद्धतीचे वक्तव्य सुद्धा केला होता. मात्र त्यांची दोघांची भेट होण्याचा योग येत नव्हता. अखेर आज नौसेना दिनाच्या निमित्ताने केसरकर आणि राणे भेटले.मात्र राणे आणि केसरकर भेटले ही बातमी समजतात त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. आज राणे केसरकर यांच्या भेटीनंतर या दोघांनीही आपल्यातल्या संघर्ष संपल्याचं दावा केला. त्यांच्या या भेटीमुळे आता कोकणातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राणे - केसरकर भेटीवर राजन तेलींची प्रतिकीया दिली आहे.

सातत्याने दहशत वादाचा मुद्दा उपस्थित करून केसरकर राणेंच्या विरोधात लढले. दहशत वादाचे कारण पुढे करत ते राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले. मग आता राणे साहेबाना भेटल्यावर तो दहशतवाद संपला का? असा प्रश्न उपस्थित करत केसरकर यांना निवडणूक जवळ आली की भाजपचे नेते आठवतात.अशा प्रकारची खरमरीत टीका केसरकर यांचे सावंतवाडी मतदारसंघातील प्रतिस्पर्धी भाजपच्या राजन तेली यांनी केली आहे.


का केला दिपक केसरकर यांनी राणेशी समजोता ?

     2009 मध्ये दीपक केसरकर - नारायण राणेंचे चांगले संबंध होते. मात्र 2012- 13 मध्ये दीपक केसरकर आणि नारायण राणेंचे संबंध बिघडले. दीपक केसरकर यांनी बंडखोरी करत शिवसेनेत प्रवेश केला. राणे विरुद्ध दीपक केसरकर असा सामना तेव्हा 2014 च्या निवडणुकीत पाहायला मिळाला. मात्र या निवडणुकीत शिवसेनेची आणि भाजपची पूरी ताकद दीपक केसरकर यांच्या पाठीशी उभी राहिली आणि दीपक केसरकर मोठ्या मताधिकाने विजय झाले. त्यानंतर 2017-18 मध्ये नारायण राणेनी आपला स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला आणि ते भाजपवासीय झाले. तरीही 2019 च्या निवडणुकीमध्ये दीपक केसरकर आणि राणे युतीत असूनही राणेनी दीपक केसरकर यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विरोध केला आणि आपली पुरी ताकद 2019 च्या निवडणुकीत राजन तेली यांच्या पाठीशी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अप्रत्यक्षरीत्या लावली. राणे यावेळी भाजपमध्ये होते.तरीही राजन तेलीची बंडखोरी  झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी युतीधर्म न पाळता दीपक केसरकर यांना मदत न करता विरोधात काम केले आणि राजन तेलींना अंडरग्राउंड मदत केली. दीपक केसरकर यांच्या पराभवासाठी आख्खी गोवा भाजप उतरल्याचा दावा तेव्हा दीपक केसरकर यांनी केला होता.

      यानंतर 2019 च्या सावंतवाडी नगराध्यक्षाच्या पोटनिवडणुकीत दीपक केसरकर यांचे हक्काचे उमेदवार बाबू कुडतरकर यांचा राणेंचे कट्टर समर्थक असलेले भाजपचे उमेदवार संजू परब यानी पराभव करून दीपक केसरकर यांना एक प्रकारचा धक्का दिला. गेली अनेक वर्ष दीपक केसरकर यांच्या हाती असलेली सावंतवाडी नगरपालिकेचे सत्ता गेली. आणि दीपक केसरकर यांना हा मोठा धक्का मानला गेला.त्याच शल्य दीपक केसरकर यांच्या मनात होतं. याच दरम्यान दोन पराभव स्वीकारलेल्या राजन तेलीनी 2024 च्या विधानसभेची तयारी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सुरू केली आहे. या दृष्टीने त्यानी कणकवलीला आपले घर असताना सावंतवाडीमध्ये आता आलिशान घरही बांधले आणि या ठिकाणी भाजपचा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा वार रूम सुद्धा उभा केला. राजन तेली यांच्यावर ते कणकवली असून बाहेरचे उमेदवार असा प्रचार केला जात होता. या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे. अशा परिस्थितीत दीपक केसरकरानी राजकीय धूर्तपणा दाखवत आपण लोकसभा लढवणार नाही तर सावंतवाडी विधानसभा शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून लढवणार अशी घोषणा काही दिवसा पूर्वी करून टाकली. राजन तेली हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात.  अशावेळी 2024 मध्ये दीपक केसरकर निवडणुकीत उभे राहिले आणि राणेनी राजन तेलीला अप्रत्यक्ष मदत केली, तर ही निवडणूक दीपक केसरकर यांना निश्चित सोपी जाणार नाही. हे त्रिवार सत्य आहे. हे दीपक केसरकरांनी ओळखलं आहे.सावंतवाडी विधानसभेच्या 2024 या निवडणुकीत जर राणेंचा पाठिंबा नसेल तर दीपक केसरकर निवडून येणं हे फार मोठी अशक्य गोष्ट आहे.अशा परिस्थितीत दीपक केसरकर हे राजकारणातील अतिशय धूर्त मानले जातात. त्यानी पुढील दृष्टिकोन ठेवून  राणेंची भेट घेतली आणि राणेचा  होता नव्हता तो सगळा राग या निमित्ताने त्यांनी घालवून टाकला. त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ जर पुन्हा एकदा चौथ्यांदा काबीज करायचा असेल तर राणेंन शिवाय दीपक केसरकर यांना पर्याय राहणार नाही.अशावेळी राणेच आपल्या समर्थकांना आणि भाजप कार्यकर्त्यांना शांत करू शकतात आणी आणि मन बदलू शकतात. हे दीपक केसरीकरांनी ओळखलेला आहे. त्यामुळे ही निवडणूक लढवण्यासाठी दीपक केसरकरांना राणेंची गरज भासणार आहे. त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीला वर्ष दीड वर्ष शिल्लक राहिले नसताना दीपक केसरकर आणि राणेंच्या विरोधात असलेला आपलं आपल वैर पूर्णपणे पुसून टाकायची दिपक केसरकर यांची ही खेळी आहे.

     दुसरीकडे नारायण राणेंच  दुसरे मोठे सुपुत्र निलेश राणे हे कुडाळ मालवण मधून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. अशावेळी या मतदारसंघात दीपक केसरकर यांचे पण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि दीपक केसरकर यांची ताकद आहे. राणेंनी सुद्धा दीपक केसरकर यांची दुष्मनी संपुष्टात आणत एक पाऊल मागे टाकला आहे. त्यामुळे राणे आपल्या मुलाला विधानसभेत पाठवण्यासाठी दीपक केसरकर यांची त्यांना फार मोठी मदत होणार आहे. त्यामुळे राजकारणातील या दोन्ही नेत्यांनी चाणक्यनिती वापरत आपापसातलं असलेलं वैर संपुष्टात आणला आहे. निश्चितच याचा फायदा या दोघांना किती होतो हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.