केसरकर - राणेंचे सावंतवाडी रेल्वेटर्मिनसबाबतचे मतभेद मिटतील ?

भेटीतील चर्चेकडे नजरा
Edited by: विनायक गावस
Published on: November 27, 2023 11:35 AM
views 646  views

सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वेटर्मिनसच भुमिपूजन होऊन ९ वर्ष झाली तरी ते पूर्णत्वास आलेल नाही. या रेल्वे टर्मिनसवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यात मतभेद झाले होते.

नारायण राणे हे टर्मिनस मडुऱ्याला व्हावं यासाठी आग्रही होते तर दीपक केसरकर हे सावंतवाडीसाठी आग्रही होते‌. यावरून दोघांत मतभेद निर्माण होऊन वाद झाला होता. २०१५ ला तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रेल्वे टर्मिनसच भुमिपूजन करण्यात आलं होतं. नारायण राणेंना वगळून हा सोहळा करण्यात आला होता. दरम्यान, कालच सावंतवाडीत रेल्वे टर्मिनस कृती समिती व प्रवासी संघटनेची स्थापना करण्यात आली. यानंतर राणे व केसरकर यांची भेट झाल्यानं सावंतवाडीकरांच्या नजरा त्यांच्या भेटीतील चर्चेकडे लागून राहिल्या आहेत.