
सावंतवाडी : माझे दोन बॅनर आहेत. मोठ्या बॅनरवर नारायण राणे यांच्यासह महायुतीचे सर्व नेतेमंडळी आहेत. लहान बॅनरवर जागा मर्यादित असल्याने सगळे फोटो नाहीत. नारायण राणे यांची संमती घेऊन मी फोटो लावला आहे. त्यांच नेहमीच मला सहकार्य राहील आहे. माझ्यावर त्यांच प्रेम आहे. फोटो वापरायची त्यांनी मला परवानगी दिली असं विधान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. नारायण राणेंसोबतच्या बॅनर विषयी विचारल असता ते बोलत होते.
ते म्हणाले, माझे दोन बॅनर आहेत. मोठ्या बॅनरवर नारायण राणे यांच्यासह पालकमंत्री, उदय सामंत, नितेश राणे, निलेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महेश सारंग, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, भाजप महिला अध्यक्षा, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्व. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचा सह महायुतीच्या नेत्यांचे फोटो आहेत. लहान बॅनरवर सगळ्यांचे फोटो घालता येण शक्य नव्हतं. त्यात मोठ्या नेत्यांसह नारायण राणे यांचा फोटो आहे. त्यासाठी नारायण राणे यांची संमती मी घेतली आहे. त्यांच नेहमीच मला सहकार्य राहील आहे. माझ्यावर त्यांच प्रेम आहे. फोटो वापरायची त्यांनी मला परवानगी दिली असं मत मंत्री केसरकर यांनी व्यक्त केले.
दरम्यान, माझा फोटो लावला नाही म्हणून काही फरक पडत नाही. मी जे काही वाटतो ते स्वतःच्या खर्चाने करतो. एखाद्याला इच्छा असेल उभं राहण्याची म्हणून ते भजन मंडळांंना वाटप करत असतील. माझी मदत ही गेली १५-२० वर्षांपासूनची आहे. भजन, दशावतार मंडळांना मी नेहमीच मदत करतो. कोरोना सोडता सातत्याने माझं काम सुरू आहे. मी जे महाराष्ट्र सरकारकडून वाटलं ते महाराष्ट्रात कुणीच वाटलेले नाही. महिलांसाठी रोजगार, मच्छिमारांसाठी आऊट बोर्ड इंजिन, इन्सुलेटेड व्हॅन दिल्या. पाच लाख अंडी येत्या काळात बाजारात येणार आहे. मी हा चमत्कार करून दाखवू शकलो. मी प्रामाणिकपणे लोकांसाठी काम करतो. दाखवण्यासाठी काम करत नाही. शेतकऱ्यांना विविध योजनांतून सहकार्य केलं. १५० पेक्षा जास्त कुटीर उद्योग उभे करून दिले. काजू व्यापाऱ्यांना अनुदान दिलं. रस काढण्यासाठी यंत्र दिली. जनतेसाठी काम करणारा मी आहे. वाटप केलं म्हणून कधी मत मागायला गेलो नाही. मला कुणावर आरोप करायचे नाही. 99 टक्के भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी माझे जिव्हाळ्याचे घरगुती संबंध आहेत. त्यामुळे मी सर्वांची काम मंजूर करतो. काही टक्के लोकांना व्यक्तिगत महत्वकांक्षा ही असणारच आहे असा टोला त्यांनी हाणला.