LIVE UPDATES

दीपक केसरकरांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट

पावसाळी अधिवेशनेच्या पार्श्वभूमीवर सदिच्छा भेट
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 23, 2026 20:02 PM
views 24  views

सावंतवाडी : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सुरू झाले असून त्या पार्श्वभूमीवर विधान भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी सदिच्छा भेट घेतली. 

श्री. केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेऊन सावंतवाडी मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. पावसाळी अधिवेशनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध समस्यांकडे लक्ष वेधले. तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांचीही तदनंतर भेट घेतली‌.