
सावंतवाडी : निलेश राणेंनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. अधिकच स्वच्छ राजकारण यामुळे जिल्ह्यात नांदेल. वाटप होत असेल तर सिंधुदुर्गची संस्कृती बिघडेल. त्यामुळे सगळ्यांनी मिळून काळजी घेतली पाहिजे. विकासाचा व्हिजन पुढे घेऊन मत मागितले पाहिजे असं मत माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, संजू परब यांची लोकप्रियता गर्दीवरून दिसते. तब्येतीमुळे डोअर टू डोअर जाऊ शकलो नाही. माझ्या गैरहजेरीचा वेगळे अर्थ काढण्याचा प्रयत्न झाला त्याचा खुलासा दिलेला आहे. शिवसेनेच संपूर्ण पॅनल विजयी होईल. डॉक्टरांनी सल्ला दिला असला तरी निवडणूक होईपर्यंत इथेच थांबणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. नगरपरिषद निवडणुकीत पैशांचा वापर करणं अत्यंत चुकीच आहे असही मत व्यक्त केले.










