
सावंतवाडी : समोरच्यांना लाज वाटली पाहिजे. ज्येष्ठ नेतेदीपक केसरकर आजही मैदानात आहेत. लोकांच्या घरी जातात, प्रचार करतात. त्यांच्या वयाचा सन्मान करण आवश्यक होतं. बोलायचं होतं तर घरात बोललं पाहिजे होतं. समाजात बोललात तर लोक अन् देव माफ करणार नाही. ज्यांचे आशीर्वाद घ्यायचे त्यांच्यावर टीका करता ? आशीर्वाद घेतले असते तर लोकांच्या मनात उंची अजून वाढली असती. पण, तेवढ मोठ मन त्यांच नाही हे आम्हाला ठाऊक आहे असा जोरदार हल्लाबोल शिवसेना आमदार निलेश राणेंनी केला. तसेच प्रदेशाध्यक्ष येतात गडबड करतात. फक्त, जिरवा जिरवीच काम करतात. आज मालवणात स्टींग ऑपरेशन केलय. आता आमचे शिवसैनिक देखील तैनात आहेत. पकडलं तर जागच्या जागी बंदोबस्त करू, सोडणार नाही असाही इशारा त्यांनी दिला.
ते पुढे म्हणाले, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवणात शिवसेनेचा भगवा व कणकवलीत शहरविकास आघाडीचा विजय होणार, फक्त औपचारिकता बाकी आहे. लोकांचा पाठिंबा आम्हाला आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण जेव्हा जिल्ह्यात येतात तेव्हा वेगळं वातावरण करून जातात. काल ते सभेला मालवणात आले त्यामुळे संशय वाटला. ते येताना काहीतरी घेऊन आल्याचा संशय होता. आपण अशा निवडणूका लढवणार का ? मालवणात काही ठिकाणी बॅगा ठेवल्या जातात, तिथून वाटप होत. लोकसंख्या किती तुम्ही वाटता किती ? असे नगरसेवक निवडून दिले तर ते लोकांचं काम करतील का ? ते वसुलीच्या कामाला लागणार आहेत. ही सिंधुदुर्गची संस्कृती नाही. काही लोक बाहेरून हे जिल्ह्यात घेऊन आले. भाजपचे जुने कार्यकर्ते असं करत असतील तर ते योग्य नाही. अशा निवडणूका घेऊन फायदा नाही. प्रदेशाध्यक्ष येतात गडबड करतात फक्त जिरवा जिरवीच काम करतात. विकासाचा अजेंडा कुठेय ? व्हिजन डॉक्युमेंट दाखवलं नाही. फक्त, धुमाकूळ घालून जाणार हे पटणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी व पोलिसांना स्पेशल पथक नेमण्यास सांगितले आहे. आमचे शिवसैनिक देखील आता तैनात आहेत. पकडल तर जागच्या जागी बंदोबस्त करू, सोडणार नाही. निवडणूकीची ही पद्धत थांबली पाहिजे. अन्यथा, केवळ भ्रष्टाचार होणार असं मत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, आम्ही युतीसाठी आग्रही होतो. दीपक केसरकर देखील आग्रही होते. मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवला. आता मत मिळवायला नारायण राणे, दीपक केसरकर यांची गरज त्यांना लागते. त्यामुळे लोक सगळं ओळखून आहेत. लोकांची दिशाभूल होणार नाही. तसेच मताला १० हजार हा आकडा आता अपडेट झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी पुढील तपास करणार आहेत. मी चूक की बरोबर ? हे निवडून निर्णय अधिकारी, पोलिस ठरणार आहेत. ते ठरवतील कोण चुकीच आहे बरोबर आहे. आम्ही एकच कुटुंब आहोत. भाजपवर देवेंद्र फडणवीस, नारायण राणेंवर आमचं प्रेम व विश्वास आहे. काही ठराविक बाहेरची लोक ज्यांच्यामुळे वातावरण खराब होत आहे. त्यांना आताच आवर घातला पाहिजे अस विधान त्यांनी केले.










