
सावंतवाडी : महाराष्ट्र विकसित होताना सिंधुदुर्ग जिल्हा देखील प्रगतीच्या वाटेवर आहे. पर्यटनासह फलोत्पादन, मच्छिमारी आदींसह सगळ्या क्षेत्रांचा विकास होत आहे. मंत्रिमंडळात नितेश राणेंसारख नेतृत्व कोकणाला लाभलं आहे. खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे यांचीही साथ आहे. आम्ही सर्वजण जिल्ह्याच्या प्रगतीसाठी बांधील आहोत असं मत माजी शिक्षणमंत्री आम. दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. तसेच २०२५ नववर्ष सिंधुदुर्ग जिल्हा व महाराष्ट्रातील नागरिकांना सुखाच व भरभराटीचे जावो अशा शुभेच्छा श्री. केसरकर यांनी दिल्या.
ते म्हणाले, नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आहेत. त्यांनाही नववर्षाच्या शुभेच्छा श्री. केसरकर यांनी दिल्या. नवं सरकार महाराष्ट्रात स्थापन झाल आहे. नवीन मंत्रीमंडळाकडून महाराष्ट्राला खुप अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना मिळूदेत अशी प्रार्थना केली. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असून अनेक पर्यटन प्रकल्प इथे येत आहेत. सुंदर समुद्रकिनारे कोकणात आहे, मच्छिमारी इथे होते. फळांचा राजा हापुस आंबा सिंधुदुर्गचा आहे. काजू उत्पादनात हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. नारळाचही मोठं उत्पादन इथे होत. फलोद्यान जिल्ह्यात फळांवर प्रक्रिया करणारे प्रकल्प होत आहेत. मोठे पर्यटन प्रकल्प होऊ घातले आहेत. इथल्या भुमिपुत्रांची लहान मोठी हॉटेल्स उभारत आहेत. फिशींग व्हीलेजसारखा प्रकल्प होत आहे. मच्छिमारांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शेतकरी, महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. पर्यटनासह फलोत्पादन, मच्छिमारी या सगळ्याचा विकास होत आहे. नितेश राणेंसारख नेतृत्व कोकणाला लाभलं आहे. खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे यांचीही साथ आहे. आम्ही सर्वजण जिल्ह्याच्या प्रगतीसाठी बांधिल आहोत. सिंधुदुर्ग जिल्हा हा हुशार मुलांचा जिल्हा आहे. विदेशात नोकरीची संधी उपलब्ध करून आम्ही देत आहोत. अनेक उद्योग राज्यात येत आहे. त्यामुळे मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहील असून भविष्यातही ते आघाडीवर राहील अस सांगत दीपक केसरकर यांनी नवं वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.