
दोडामार्ग : महायुतीच्या माध्यमातून आज दोडामार्ग येथे काढण्यात आलेली रॅली पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. युवाई आपल्याकडे आहे असे म्हणणारे विशाल परब कोण? असा प्रश्न आज भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस अंकुश नाईक यांनी उपस्थित केला आहे. दोडामार्ग तालुक्यातील अखंड युवा वर्ग आज महायुतीकडे आहे. त्यामुळे महायुतीचा विजय निश्चित आहे यात काहीच शंका नाही असे मत अंकुश ( भैया ) नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले की भाजप युवा मोर्चा, शिवसेना युवा वर्ग आरपीआय अजित पवार गट सर्व महायुती यांच्या माध्यमातून आज दोडामार्ग तालुक्यातील उगाडे कळणे येथून दुचाकी व चारचाकी वाहनांच्या माध्यमातून आज रविवारी दोडामार्ग बाजारपेठ आयी रोड पर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो युवा वर्ग उपस्थित असल्याचे आपण पाहिले आहात. काही युवक यां रॅलीत सहभागी होऊ शकले नाही मात्र दोडामार्ग तालुक्यातील सर्व युवा वर्ग आज महायुतीच्या पाठीशी आहे. महायुतीचे उमदेवार दीपक केसकर हे 20 हजार मताधिक्याने निवडून येतील यात काडीमात्र शंका नाही. आजची भव्य रॅली पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
अपक्ष उमेदवार विशाल परब कोण? ओ दोडामार्ग तालुक्यातील युवा वर्ग आपल्या पाठीशी आहे अस म्हणाऱ्या विशाल परबने लक्षात ठेवाव की दोडामार्ग तालुक्यातील युवा वर्ग महायुतीच्या पाठीशी आहे. बोकडाचे मटण घालून स्नेह भोजन केले म्हणजे युवा वर्ग आपला होत माही मटण घातलेली बोकड आम्ही तुम्हाला परत देऊ अस भाजप युवा मोर्चा सरचिटणीस अंकुश ( भैया ) नाईक यांनी प्रसिद्धी कात्रकात म्ह्टले आहे.