केसरकरांसाठी सीएम शिंदेंची सून मैदानात

सावंतवाडी झंझावाती प्रचार
Edited by: विनायक गांवस
Published on: November 17, 2024 19:36 PM
views 364  views

सावंतवाडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुनबाई सौ. वृषाली श्रीकांत शिंदे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात झंझावाती प्रचार केला. महायुतीचे उमेदवार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ मोती तलाव काठावर त्यांनी प्रचार केला. त्यांच्या सोबत शिवसेना नेत्या शितल म्हात्रे यांनीही प्रचारा दरम्यान सहभाग घेतला. 

सावंतवाडी शहरातील कॉर्नर बैठकीस उपस्थित रहात वृषाली शिंदे यांनी दीपक केसरकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन केले. यावेळी महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी देखील उपस्थितांना केलेल्या विकासकामांची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात समृद्ध नांदली, गोरगरीब, महिला, विद्यार्थ्यांना न्याय दिला असे मत केसरकर यांनी व्यक्त करत विजयाचा विश्वास व्यक्त केला.

 यावेळी सौ. वृषाली श्रीकांत शिंदे, शिवसेना नेत्या शितल म्हात्रे, माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर, सौ. सोनाली केसरकर-वगळ, महिला जिल्हाप्रमुख अँड निता सावंत कविटकर, माजी उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर, भारती मोरे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.