
दोडामार्ग : महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या पाठीशी दोडामार्ग तालुक्यातील युवा वर्ग ठामपणे उभा आहे. जेव्हा युवक एकत्र येतात तेव्हा कोणतेही वादळ आले तरी ते परतवण्याची ताकद युवकांमध्ये आहे. तालुक्यामधील युतीतील चारही पक्षातील एकत्र आलेले युवक केसरकरांना भरघोस मताधिक्याने निवडून देण्यासाठी काम करीत आहेत. आणि केसरकर यांचाच विजय निश्चित आहे असा विश्वास रॅलीत सहभागी झालेल्या युवकांनी दिला आहे.
मणेरी मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय पक्षाच्या युवा नेतृत्वांकडुन आज भव्या बाईक रॅली काढण्यात आली. उगाडे येथून रॅलीची सुरुवात झाली. ही रॅलीत सहभागी युवकांनी घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला. केसरकर यांच्या विजयासाठी व महायुतीची ताकद दाखविण्यासाठी काढण्यात आली होती. रॅली ऊगाडे येथुन थेट दोडामार्ग बाजारपेठेत आली. बस स्थानकच्या आवारात युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली. नगराध्यक्ष चेतन चव्हाण म्हणाले की, महायुतीचा प्रत्येक युवक दीपक केसरकर यांच्या प्रचारासाठी बाहेर पडला आहे. केसरकर हेच निवडून येणार आहेत. तर, नाईक म्हणाले की, केसरकर करांच्या पाठीशी असलेली युवा शक्ती मोठी आहे. विरोधात असलेले राजन तेली जरी तुल्यबळ प्रतिस्पर्धी असले तरी आमच्या वरिष्ठाने किती धर्म पाळण्याच्या दिलेल्या आदेशानुसारच युवा वर्ग काम करीत आहे त्यामुळे युवक केसरकर यांच्यात पाठीशी ठामपणे उभे आहेत. युवकांची लाभलेली साथ ही बहुमोलाची आहे. तसेच युवकांची याही पुढे अशेच सहकार्य लाभणार आहे. युवकांनी जर मनात ठरवलं तर ते काय करु शकतात हे या रॅलीतुन दिसून आलं आहे. जे आयात उमेदवार आहेत त्यांना आम्ही नक्कीच माघारी पाठवू असे शिवसेना युवा प्रमुख भगवान गवस यांनी सांगितले.
यावेळी भाजप युवा मोर्चा सरचिटणीस अंकुश उर्फ भैया नाईक, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजप युवा तालुकाप्रमुख पराशर सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान गवस, युवा कार्यकर्ते देवेंद्र शेटकर, दीपक गवस, गोकुलादास बोंद्रे व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.