
वेंगुर्ला : तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उभादांडा ग्रामपंचायत उपसरपंच टीना आल्मेडा व ग्रामपंचायत सदस्य राधाकृष्ण पडणेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यां समवेत सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. दीपक केसरकर यांनी उभादांडा गावासाठी दिलेल्या भरघोस विकास निधीमुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून हा प्रवेश करण्यात आला.