माजी नगरसेवक एकवटले ; केसरकरांचा 'डोअर टू डोअर' प्रचार

Edited by: विनायक गांवस
Published on: November 12, 2024 20:29 PM
views 29  views

सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना विजयी करण्यासाठी महायुतीचे माजी नगरसेवकांनी एकत्रितपणे डोअर टू डोअर प्रचार केला. धनुष्यबाण चिन्ह दाबून केसरकर यांना चौथ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन केले. शहरात केसरकरांकडून प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसून आले. 


सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले तसेच माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर यांनी एकत्रितपणे शहरात झंझावाती प्रचार केला. दीपक केसरकर यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शहरात केलेल्या विकास कामांच्या जोरावर दीपक केसरकर मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास माजी नगरसेवकांनी व्यक्त केला. यावेळी युवराज लखमराजे भोंसले, माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, देव्या सुर्याजी, संतोष गांवस, परिक्षीत मांजरेकर, विनोद सावंत, प्रतिक बांदेकर, मेहर पडते, अँड. कौस्तुभ गावडे, निखिल सावंत, आदित्य आरेकर, प्रथमेश प्रभू, देवेश पडते, ओंकार सावंत, साईश वाडकर, श्री.अनगोळकर आदिंसह युवासैनिक उपस्थित होते.