केसरकरांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मैदानात

Edited by: विनायक गांवस
Published on: November 12, 2024 13:42 PM
views 111  views

सावंतवाडी : विधानसभा निवडणूकीसाठी काही दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार फेऱ्यांनी वेग घेतला आहे. सावंतवाडी मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा प्रचार करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या ताकदीने मैदानात उतरले आहेत. सावंतवाडी शहरातील प्रभाग नंबर २ येथे घरोघरी प्रचार करण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी केसरकर मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.


यावेळी माजी नगरसेवक आणि शिवसेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर, माजी नगरसेविका दिपाली सावंत, शाखाप्रमुख विद्या सावंत, कृष्णा लाखे, दत्ता सावंत, ज्योत्स्ना सुतार, अरुणा नाईक, जयश्री राणे आदी उपस्थित होते. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहरातील घरोघरी तसेच बाजारात येणाऱ्या महिला व पुरुषांना केसरकरांच्या कामबद्दल माहिती दिली. मतदारांमधूनही केसरकर यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. केसरकर यांच्या धनुष्यबाण चिन्हाला मत देऊन त्यांना विजयी करा असे आवाहन शहरप्रमुख बाबू कुडतरकर यांनी मतदारांना केले. मंत्री दिपक केसरकर यांच्याकडून या मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. आमचे लाडके दिपक केसरकर महिलांच्या हातांना रोजगार देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. यापुढेही आम्हा महिलांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास आहे त्यामुळे आमचा सर्व महिलांचा पाठिंबा केसरकरांना असणार असल्याचे महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले.