पैशाला बळी पडणारी सावंतवाडी नाही, हे दाखवून द्या : दीपक केसरकर

Edited by: विनायक गांवस
Published on: October 29, 2024 07:31 AM
views 141  views

सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकर चौथ्यांदा उमेदवारी अर्ज भरतायत. त्यापूर्वी सभा सुरु आहे. यावेळी दीपक केसरकर बोलत होते. 

दीपक केसरकर म्हणाले, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी अर्ज दाखल करत आहेत. माझ्या वडीलांनी आजवर अनेकांना रोजगार दिला. रेशमी वस्त्र उतरून खादीची वस्त्र मी लोकसेवेसाठी घातली आहेत. सिंधुरत्न योजनेतून कोकणी जनतेच हीत साधण्यासाठी सर्वकाही केलं आहे. पर्यटन जिल्ह्यात लाईव्ह स्टार हॉटेल आणलं. शेतकऱ्याना अतिरिक्त ६० कोटी कंपनीकडून मिळवून दिले आहेत. शेतकऱ्यांच हित बघणार आमचं सरकार आहे. 


नारायण राणेंनी मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्गला पर्यटन जिल्हा म्हणून ओळख दिली‌. या पर्यटन जिल्ह्यासाठी मी योगदान देऊ शकलो. आमदार म्हणून तुमचं काम करू शकलो. आज व्यासपीठावर महायुतीचे तिन्ही उमेदवार आहेत. राजघराण्याचे युवराज लखमराजे भोंसले आमच्यासह आहेत. पुण्यश्लोक बापुसाहेबांच शताब्दी वर्ष सुरू आहे. पैशाला बळी पडणारी सावंतवाडीची जनता नाही हे पुन्हा एकदा दाखवून द्या. प्रेमाची ताकद दाखवून द्या. मी महायुतीचा उमेदवार आहे. हे शिवधनुष्य नरेंद्र मोदी यांनी उचललं आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार त्यांना साथ देत आहेत‌. त्यांचे हात बळकट करा, महायुतीचे तिन्ही उमेदवार विजयी करा असं आवाहन दीपक केसरकर यांनी  केले