मंत्री केसरकरांच्या निवासस्थानी 'प्रतिशिर्डी' !

अनेक वर्षांच स्वप्न पूर्ण ; शिरशिंगे धरण मंजूर : दीपक केसरकर
Edited by: विनायक गांवस
Published on: October 10, 2024 12:58 PM
views 297  views

सावंतवाडी : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी शिर्डीच्या साईबाबांची प्रतिकृती असणाऱ्या देवाऱ्याची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. मंत्री केसरकर यांनी धावती भेट देत साईंची आरती केली. मल्टीस्पेशालिटीचा एक विषय राहीला असून तो निकाली लागला तर माझी सर्व आश्वासन साईबाबांच्या आशीर्वादाने पुर्ण होतील अस मत दीपक केसरकर यांनी यावेळी व्यक्त केले.


दीपक केसरकर म्हणाले, शिक्षण विभागातील 66 हजार शिक्षकांना न्याय देऊ शकलो याचा सार्थ अभिमान आहे. सावंतवाडी तालुक्यात अनेक वर्षे रेंगाळेल शिरशिंगे धरण आज मंजूर झाले आहे. शेजारील कलंबिस्त, वेर्ले, सांगेलीसह आठ गावांना पाणी येणार असून शेतकऱ्यांना फायदा होईल. अनेक वर्षांच माझं स्वप्न पूर्ण होत आहे. एकच मल्टीस्पेशालिटीचा विषय राहीला असून येत्या काही दिवसांत तो निकाली लागला तर माझी सर्व आश्वासन साईबाबांच्या आशीर्वादाने पुर्ण होतील अस मत श्री. केसरकर यांनी व्यक्त केले. केसरकर यांच्या निवासस्थानी शिर्डीच्या साईबाबांची प्रतिकृती असणाऱ्या देवाऱ्याची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यांच्या हस्ते साईंची आरती करण्यात आली.