
सावंतवाडी : सावंतवाडीतील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या नवदुर्गांचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दर्शन घेतले. शहरातील दुर्गामातांच्या चरणी ते लीन झाले.
शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळ, माठेवाडा नवरात्रोत्सव मंडळ, रासाई युवा कला-क्रीडा मंडळ व ओंकार नवरात्रोत्सव मंडळाच्या नवदुर्गांचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दर्शन घेतले. देवीची पूजा आराधना करत आरती केली. यावेळी राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव अशी प्रार्थना केली.
यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, युवा सेना तालुका प्रमुख प्रतिक बांदेकर,शहरप्रमुख अर्चित पोकळे, माजी नगरसेविका शुभांगी सुकी, अतुल पेंढारकर, संतोष मुंज, उमेश माने, शैलैश मेस्त्री, नंदू गांवकर, दत्तू नार्वेकर, निखिल सावंत,व र्धन पोकळे, रोहित पोकळे, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, नंदू शिरोडकर, साईश वाडकर, नंदू घाटे, बाळू कशाळीकर, आदी उपस्थित होते.