केसरकरांचे उद्योगपती निवडणूक आले कि येतात निवडणूक झाली कि जातात

रूपेश राऊळ यांचा टोला
Edited by: विनायक गांवस
Published on: September 25, 2024 08:24 AM
views 166  views

सावंतवाडी : निवडणूक आली की मंत्री दीपक केसरकर यांचे उद्योगपती मतदारसंघात येतात. मागच्या पंधरा वर्षातला हा इतिहास आहे. मात्र, निवडणूक झाली की सहा महिन्यांत हे उद्योगपती गायब होतात असा टोला उबाठा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी हाणला. 

ते म्हणाले, निवडणूकीच्या तोंडावर हे प्रकार होतात. मात्र, किती उद्योग मतदारसंघात उभारले आहेत ? काही उद्योगपतींच्या चौकशा लागल्यात. दीपक केसरकर यांच्याविषयी जनतेत रोष आहे. येणाऱ्या काळात परिवर्तन अटळ आहे असं मत श्री. राऊळ यांनी व्यक्त केले. तर चांगले जनतेच्या हिताचे उपक्रम सावंतवाडीत काहीजण घेत आहेत. मात्र, ते करताना जनतेला त्रास होणार नाही याचीही काळजी घ्यावी. आपण किती धनाड्य आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न होऊ नये असा चिमटा विशाल परब यांना काढला. 

दरम्यान, लॅंडमाफीया कोण हे संजू परब यांनी नावानीशी जाहीर कराव. जनतेत संभ्रम निर्माण करू नये. नगराध्यक्ष राहीलेल्या संजू परब यांनी लॅंडमाफीया जाहीर करावा अन्यथा राजकीय संन्यास घ्यावा अस आव्हान रूपेश राऊळ यांनी दिलं. तर सासोली आंदोलनात संदेश पालरकर विरुद्ध बाबुराव धुरी अशी दुफळी पक्षात माझ्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी व संदेश पारकर हे माझे नेते आहेत. मी विधानसभा प्रमुख आहे त्यामुळे यावर भाष्य करणार नाही. याबाबत वरिष्ठ बोलू शकतील अस मत व्यक्त केले. यावेळी उप जिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शहरप्रमुख शैलैश गवंडळकर आदी उपस्थित होते.