
वेंगुर्ला : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवस शिरोडा जिल्हा परिषद मतदार संघात सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी शिरोडा येथील विद्युत वितरण विभागात पंचक्रोशीत वायरमनचे काम करणाऱ्याना रेनकोटचे वाटप तसेच शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, कोस्टल भागाचे तालुका प्रमुख काशिनाथ नार्वेकर, उपतालुका प्रमुख कौशिक परब, ग्रामपंचायत सदस्य बांदेकर, दत्तगुरु परब, रवी पेडणेकर, गौरेश बर्डे, संजय गावडे, शीतल साळगावकर, हर्षा परब, उमा मठकर, संदीप मसुरकर आदी उपस्थित होते.