
दीपक वसंतराव केसरकर अर्थात जनतेचे लाडके 'दीपकभाई' ! जनतेहितासाठी अहोरात्र काम करणारे, राजकारणापेक्षा विकासाला अधिक महत्व देणारं शांत, संयमी, सुसंस्कुत, अभ्यासू नेतुत्व. सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग या विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असताना वेंगुर्ला तालुका पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक नकाशावर झळकवण्यासाठी अहोरात्र काम दीपक केसरकर यांनी गेल्या १० वर्षात केले आहे. अनेक प्रलंबित प्रश्न तत्काळ मार्गी लावत कोट्यवधींचा निधी वेंगुर्ला तालुक्याला दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मिळाला आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यातील त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा...
दीपकभाईंची एकूणच राजकीय आणि सामाजिक वाटचाल सामान्य माणसांशी जोडलेली राहीली आहे. मतदार संघातील सर्व गावागावात विकासाची गंगा यावी यासाठी सर्व ठिकाणि त्यांनी विकास निधी दिला आहे. मग एखादी ग्रामपंचायत विरोधातील का असो सर्व भागाचा विकास झाला पाहिजे हा त्यांचा नेहमीच मानस राहिला आहे.
खरंतर पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने गेल्या वीस पंचवीस वर्षांमध्ये विकासात्मक काम व्हायला पाहिजे होतं ते सरकारी धोरणामुळे होऊ शकले नाही परंतु याच्यावर सुद्धा मात करून केसरकर यांनी विकासाची गंगा या जिल्ह्यात आणली. सिआरझेड ची अडचण मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये भेडसावत असताना या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढून दिल्यामुळे किनारपट्टीतील मच्छीमार बांधवांना याचा मोठा फायदा झाला. वेंगुर्त्यामध्ये गेल्या १० वर्षाच्या कालखंडामध्ये जी विकासकामे झाली त्या विकास कामांना मोठ्या प्रमाणामध्ये निधी देऊन खऱ्या अर्थाने वेंगुर्ला शहरा सहित तालुक्याचा कायापालट त्यांनी केला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आज वेंगुर्ल्यात पर्यटक वाढू लागले आहेत. स्थानिक छोट्या छोट्या स्टोल धारकांच्या हाताला काम मिळाले आहे याला एकमेव कारण म्हणजे दीपक केसरकर यांनी आणलेला वेंगुर्ले बंदर रोड व नवबाग समुद्र किनारा जोडणारा झुलता पूल प्रकल्प. आज अनेक पर्यटक या पुलाला भेट देत पर्यटनाचा आनंद घेतात.
याशिवाय शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सुसज्ज मच्छी मार्केट, भाजी मार्केट, सांस्कृक्तिक वैभव असणारे बहुद्देशीय मधुसूदन कालेलकर नाट्यगृह, बॅ नाथ पै यांच्या आठवणींना उजाळा देणारे व त्यांच्या कार्याची माहिती देणारे बॅ नाथ पै स्मारक, उपजिल्हा रुग्णालय, तरुण पिढीला रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणारे आयटीआय, दळणवळणासाठी उत्तम रस्ते, पूल, यात्रास्थळ विकास कार्यक्रमांतर्गत मंदिरांचे सुशोभिकरण, भक्तनिवास, गणेश विसर्जन घाट, ग्रामपंचायत कार्यालयाचे विस्तारीकरण, बंदर विकासांतर्गत मासे सुकविण्यासाठी जागा, जेट्टी, मच्छिमारांसाठी शेड, विद्यार्थ्यांसाठी शाळांची दरुस्ती, वर्गखोलीचे बांधकाम, सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून बंधारे, तलाव, जिल्हा मार्ग विकास कार्यक्रमातून रस्त्यांचे मजबुतीकरण अशी विविध कामे दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मार्गी लागली आहेत.
याशिवाय वेंगुर्ला तालुक्याच्या पर्यटनातील महत्वाचा केंद्रबिंदू ठरणारा असा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी व स्कुबा डायविंग प्रकल्प वेंगुर्ला येथे होणार आहे. २०१९ साली अर्थ मंत्री असताना खऱ्या अर्थाने दिपक केसरकर यांनी या प्रकल्पाला चालना देत पुढे सातत्याने याचा पाठपुरावा केला होता. या प्रकल्पात वेंगुर्ला बंदरात पाणबुडी केंद्र तर मालवण वेंगुर्ला दरम्यानच्या खोल समुद्रात नौदलाच्या विनावापर युद्धनौकेचा वापर करून समुद्रात कृत्रिम प्रवाळाद्वारे सबमरीन स्कुबा डायविंग प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. याशिवाय वेंगुर्ला बंदर विकसित केले जाणार आहे. समुद्रात सुसज्ज सर्व ब्रिज बांधण्यात येणार आहे. आणि यामुळे निश्चितच वेंगुर्ल्याचे पर्यटन आंतरराष्ट्रीय नकाशावर झळकणार यात शंका नाही.
याशिवाय मांडवी खाडीच्या मुखावर मोठ्या प्रमाणात गाळ साचत असल्याने येथील मच्छिमार बांधवांच्या बोटी समुद्रात जाण्यासाठी अडचण निर्माण होत होती यासाठी दीपक केसरकर यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून ब्रेक वॉटर बंधारा निर्माण केला जात आहे. तसेच वेंगुर्ला शहरा सहित जिल्ह्यातील खेळाडूंना सुसज्ज अशा सोई उपलब्ध व्हाव्या यासाठी दिपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नातून वेंगुर्ला क्रीडा संकुल येथे इंडोअर खेळासाठी "मल्टी प्लेफिल्ड हॉल" निर्माण केला जाणार आहे यासाठी भरीव असा निधी मंजूर करण्यात आला आहे. कोकणातील पाहिले सुसज असे स्टेडियम वेंगुर्ल्यात होणार असून यात ४०० मीटर सिंथेटीक धावण मार्ग, फुटबॉल मैदान व प्रेक्षक गॅलरीसहित बैठक व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहेत. यामुळे आता वेंगुर्ला स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा पुढील काळात उपलब्ध होणार आहेत. एकूणच वेंगुर्ला परिसराचा शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, कला, क्रीडा, आरोग्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रात सर्वांगीण विकास हा गेल्या १० वर्षात दीपक केसरकर यांच्या माध्यमातून झाला आहे. आणि म्ह्णूनच बोलण्यापेक्षा कृतीवर विश्वास ठेवणारे नेते कोकणच्या विकासाला नव्या जोमान, नव्या उमेदीने चालना देण्यासाठी सज्ज झालेल्या दीपकभाईंना वाढदिवसानिमित्त आणि पुढील वाटचालीसाठी मनपुर्वक शुभेच्छा !