
सावंतवाडी : राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्यक्रमांच आयोजन दीपकभाई केसरकर मित्रमंडळ व शिवसैनिकांच्या वतीनं करण्यात आलं आहे. सकाळी १० वा. रक्तदान शिबीरीचा शुभारंभ, १०.३० वा. वाढदिवस सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
तदनंतर गरजवंतांना, कॉलेज विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे. समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा आंब्याचे रोप देऊन सत्कार करण्यात येणार आहे. दुपारी हॉस्पिटलमध्ये फळे वाटप व सायंकाळी-लाखे वस्तीमध्ये शालेय वस्तू व छत्र्या वाटप करण्यात येणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी केल आहे.