
दोडामार्ग : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग तालुक्यात विविध कार्यक्रम आयोजित केले असल्याचे तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस यांनी सांगितले आहे.
उद्या सकाळी 10 वाजतां येथील शिवसेना कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा करणार, तसेच 11 वाजता दोडामार्ग ग्रामीण रुग्णालंय येथे रुग्णाना फळ वाटप, तसेच त्या नंतर साटेली भेडशी आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ वाटप, 12 वाजता करूणा सदन स्कुल मध्ये रांगोळी स्पर्धा, रेखा स्पर्धा, विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत, असे गवस यांनी सांगितले.