म्हापणात असा होणार दीपक केसरकरांचा वाढदिवस

म्हापण जि प मतदार संघ शिवसेना व कोचरा सरपंच यांच्यावतीने आयोजन
Edited by: विनायक गांवस
Published on: July 16, 2024 09:21 AM
views 375  views

वेंगुर्ला : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार १८ जुलै रोजी म्हापण जिल्हा परिषद मतदार संघ शिवसेना व कोचरा सरपंच योगेश तेली यांच्या वतीने सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

    १८ जुलै रोजी सकाळी ८ वाजता येथील श्री गुरुदेव दत्त मंदिरात लघुरुद्र, सकाळी ९.३० वाजता माध्यमिक शालांत परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या अर्पिता अमेय सामंत हिचा कोचरा ग्रामपंचायत हॉल येथे विशेष सन्मान, सकाळी १० वाजता माध्यमिक शालांत परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व विशेष मान्यवरांचा सत्कार सोहळा, सकाळी ११ वाजता वृक्षारोपण व वृक्षवाटप कार्यक्रम व यानंतर दीपक केसरकर वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून यावेळी म्हापण जिल्हा परिषद मतदार संघातील शिवसेना तसेच महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना विभागप्रमुख देवदत्त साळगांवकर यांनी केले आहे.