राऊतांनी अधिक काळजी करू नये, ते पुढे खासदार नसतील : दीपक केसरकर

Edited by: विनायक गांवस
Published on: April 24, 2024 16:02 PM
views 141  views

सावंतवाडी : खासदार विनायक राऊत यांनी आयुष्यात काही केलं नाही. मल्टीस्पेशालिटी, सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला देखील निधी मीच मंजूर करून दिला. त्यामुळे राऊतांनी अधिक काळजी करू नये. ते पुढे खासदार नसले तरी त्यांनी ऐकलेल्या घोषणा आम्ही पूर्ण करू, त्यांनी त्याचा आनंद घ्यावा असा खोचक टोला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी हाणला. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


 ते म्हणाले, शिक्षण खात्यातून बॅंकेतून अपहार झाल्याच्या बातम्या येत आहे. हे खात क्रीडा विभागाच खात आहे. आमच खात शिक्षण व क्रीडा खात असं आहे. दोन्ही खात्याचे मंत्री व सचिव वेगळे असतात. इथे कोणताही अपहार झालेला नाही. बॅंकेतून खोट्या सह्या व खोटे चेक घेऊन रक्कम दुसरीकडे गेली आहे.माझ ते खात नाही. पण, याची तक्रार झालेली आहे. पोलिस गुन्हेगाराला पकडतील असं मत त्यांनी व्यक्त केल. शिक्षणखात्याबद्दलच्या प्रकरणाचा खुलासा त्यांनी केला.  दरम्यान, पाच जिल्हा परिषदांच्या सभा गुरुवारी होणार असून शुक्रवारपासून गावभेट दौरा करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा प्रचार करणार आहे. हे करत असताना गावातील विविध समस्या देखील लक्षात येतात. आचारसंहिता संपल्यावर ही काम पूर्णत्वास आणली जातील. लोकांची अपेक्षा असते की मी त्यांना भेटाव. मोठ्या प्रमाणात विकास निधी मी गावागावात दिला आहे. लोकांच्या अनेक समस्या असतात‌. काही दिवसांत आम्ही ते सोडवू शकतो. ते प्रश्न आमच्यापर्यंत पोहचण्यासाठी एक सिस्टीम डेव्हलप केली असून थेट माझ्या कार्यालयातून जनतेच्या कामांचा पाठपुरावा घेतला जाईल. समोरच्या माणसाला देखील आपल्या कामाची माहीती मोबाईलवर मिळेल‌. 'लोकनेता' नावाच रजिस्ट्रेशन झालं असून त्याची पहिली सुरूवात सावंतवाडीतून होणार आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रत्येकाचा डायरेक्ट कनेक्ट माझ्या कार्यालयाशी होणार आहे. मोठ्या प्रमाणात न्याय लोकांना मिळणार आहे.‌ लोकांच्या प्रेमातून उतरायी होण्याची संधी मला मिळणार आहे. 


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना माझ्यापेक्षा अधिक मत देण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी शेवटचे तीन दिवस राणेंसोबत जाहीर सभा घेणार आहे. माझ्या मतदारसंघात ठाकरे गटाचे नेते येत आहेत. त्यांना लोकांची ताकद दाखवून द्यायची आहे. महालातून राज्य चालवण्याची सवय उबाठाच्या लोकांना आहे अशी टीका त्यांनी केली. तर मल्टीस्पेशालिटीस राजघराण्याकडून जमीन देण्याचा कॅबिनेटमध्ये ठराव झाला आहे. न्यायालयीनबाबीमुळे थोडा वेळ लागला ही वस्तुस्थिती आहे. परंतु, हॉस्पिटल लगत मल्टिस्पेशालीटी असल्यास त्याचा फायदा रूग्णांना होतो. २०० बेडच हॉस्पिटल या ठिकाणी तयार होऊन अधिकचे डॉक्टरही उपलब्ध असतात. सावंतवाडीच मल्टिस्पेशालीटी आदर्शवत असेल. काम सगळी मीच मंजूर केलीत. खासदार विनायक राऊत यांनी आयुष्यात काही केलं नाही. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला देखील निधी मीच मंजूर करून दिले. त्यामुळे विनायक राऊत यांनी अधिक काळजी करू नये. ते पुढे खासदार नसले तरी त्यांनी ऐकलेल्या घोषणा आम्ही पूर्ण करू, त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. ते पुढे खासदार नसले व एखादं काम घेऊन आले तर नक्की ते करू अशी खोचक टीका केली.


तर पालकमंत्री यांच्यासोबत भेट झाल्यानंतर शिवसैनिकांचे मतभेद दुर झाले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सर्व शिवसैनिक दिसतील. आम्ही साधी माणसं पण व्हॅनिटी व्हॅन वापरू शकतो. केवळ उद्धव ठाकरे यांनी ती वापरावी असं थोडीच आहे. आमची व्हॅन तर छोटीशी आहे. मी पक्षाचा स्टार प्रचारक आहे. माझ्या व्हॅनिटीचा खर्च हा पक्षाच्या खर्चात येतो. उद्धव ठाकरे ग्रामीण भागात कधी फिरत नाही. शहरातही त्यांना व्हॅन लागते. ग्रामीण भागात केवळ झोपण्यासाठी मी व्हॅनिटी वापरणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या व्हॅनीटीकडे डोळे उघडून बघा आणि मग माझ्यावर टीका करा असं ते म्हणाले. तर मुद्दाम पावसात भिजायला काही अर्थ नसतो. त्यामुळे विनाकारण आजारी पडायला होतं अशी टीका उद्धव ठाकरेंच्या पावसातील सभेवर केली. तर विनायक राऊत प्रतिमुख्यमंत्री म्हणून वावरत होते. दोन वेळा मंत्र्यालयात जात उद्धव ठाकरेंनी वर्ल्ड रेकॉर्ड केला. उद्धव ठाकरेंनी राहूल गांधींना मिठी मारल्यान धनुष्यबाण आमच्याकडे आला. मी साईबाबांचा आशीर्वाद घेऊन आलो आहे. धडाधड काम सुरु झाली आहेत. शुक्रवारपासून राणेंना विजयी करण्यासाठी मैदानात उतरणार अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.