सावंतवाडा येथील विहिरीचे लोकार्पण

Edited by: लवू परब
Published on: April 26, 2025 13:34 PM
views 256  views

दोडामार्ग : कसई - दोडामार्ग सावंतवाडा राष्ट्रोळी मंदिर परिसरात बरीच वर्षे मागणी असलेल्या पाण्याच्या विहीरीचे अखेर काम पूर्ण झाले. नगराध्यक्ष चेतन चव्हाण व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा श्रीफळ वाढवून उत्साहात पार पडला.

 कसई दोडामार्ग नगरपंचायतच्या माध्यमातून सावंतवाडा येथील राष्ट्रोळी मंदिर येथे पिण्याच्या पाण्याची विहीर बांधण्यात आली. त्या विहिरीचे बांधकाम आज पूर्ण झाले असून ही विहीर लोकांच्या सेवेत देण्यासाठी शनिवारी सकाळी या पाण्याच्या विहिरीचे लोकार्पण नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी त्यांच्या उपनगराध्यक्ष देविदास गवस, मुख्याधिकारी संकेत गायकवाड, शिक्षण व आरोग्य सभापती संध्या प्रसादी, बांधकाम सभापती रामचंद्र मणेरीकर, महिला व बालकल्याण सभापती क्रांती जाधव, नितीन मणेरीकर, संजना म्हावळणकर, सुकन्या पनवेलकर, समीर रेडकर, सुधीर पनवेलकर, तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक गवस, पराशर सावंत, देवेंद्र शेटकर, सोबत सुधीर सावंत, प्रकाश रेडकर, विश्वनाथ रेडकर, केशव रेडकर, राजन अंबडोस्कर, श्रीधर रेडकर, प्रभाकर रेडकर, प्रभाकर बोर्डेकर, दादा बोर्डेकर, राजू बोर्डेकर, रामचंद्र नाईक, सुदेश तुळसकर, गोकुळदास तोरसकर, उल्हास रेडकर, प्रभाकर मणेरीकर, अर्जुन सावंत, प्रभाकर बेतकेकर, दादा रेडकर, ओंकार रेडकर, वैभव रेडकर, विवेक नाईक, गुरू नाईक, संगम बोर्डेकर, शिवम आंबडोसकर, गौतम महाले, विक्रम सावंत, स्वप्नेश रेडकर, देवानंद मणेरीकर, आनंद तुळसकर, काका रेडकर, विष्णू खांबल, महेश नाईक,रुपेश बोर्डेकर, भैय्या बेतकेकर, अभिषेक नेमाने, प्रबोधन मठकर, नगरपंचायत कर्मचारी शिरोडकर, कोळेकर, केतकर आदी मोठ्या संखेने उपस्थित होते.