
सावंतवाडी : उद्यापासून सावंतवाडीत समर्पण ध्यान योग व्हिडिओ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत हे शिबीर संपन्न होणार असून, योग शिबीर शाळा नंबर २ जुना बाजार, सावंतवाडी येथे आयोजित केले असून श्री शिवकृपा स्वामी फाउंडेशन हे आयोजक आहेत.
समर्पण ध्यानयोगाचे प्रणेते परमपूज्य श्री शिवकृपानंद स्वामीजींनी त्यांच्या आठ दिवसांच्या शिबिरात सोप्या मधुर भाषेत या ध्यान योगावर जी प्रवचने केली ती या व्हिडीओ शिबिरामध्ये संग्रहित केली आहेत. आपले कुटुंब, मुलेबाळे (५ वर्ष +) आणि मित्रपरिवारासह ह्या शिबीरात सहभागी झालात, आणि आत्मभाव ठेवून हे सर्व प्रवचने केली तर सर्वांना अनेक लाभ होऊ शकतात, असे आयोजकांनी कळविले आहे.
ध्यानाचे काही फायदे -
- नियमित ध्यान केल्याने तुमच्या आजूबाजूला एक सकारात्मक उर्जेचा आभामंडळाची आणि सुरक्षाकवचाची निर्मिती सकारात्मक ऊर्जेमुळे शारीरिक व मानसिक संतुलन, आरोग्य व समाधानाची प्राप्ती
- विद्यार्थी आणि तरुणांसाठी विशेष महत्वाचे म्हणजे एकाग्रता व
- आत्मविश्वास वाढणे व सुप्त असलेल्या सृजनशीलतेचा विकास आणि कार्यामध्ये यश
- समर्पण ध्यान योग हा एक संस्कार आहे जो एका पवित्र आत्म्या द्वारे एका पवित्र आत्म्यावर होतो. हा संस्कार आपल्या ऋषीमुनींची देणगी आहे म्हणून हा सर्वांसाठी संपूर्णतः निशुल्क आहे
- हा जात, धर्म, देश, भाषा, वर्ण, लिंग या बंधना पलीकडचा आहे. प्रत्येक मनुष्याचा सर्वागीण विकास हाच याचा उद्देश आहे
- शिबिरात सहभागी होऊन स्वतः अनुभव घेऊन तुम्ही हा अमूल्य संस्कार जाणून घेऊ शकता, शिबिरात सर्वाचे स्वागत आहे शिबिरात येऊन अवश्य लाभ घ्यावा, असे आयोजकांनी कळविले आहे.