राजवाडीत गरम पाण्याच्या कुंडांचं सुशोभीकरण

Edited by:
Published on: February 10, 2025 12:13 PM
views 241  views

चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथील गरम पाण्याचे कुंड सुशोभीकरण कामाचे भुमिपुजन चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम यांच्याहस्ते संपन्न झाले.

मतदार संघातील वैशिष्ट्यपुर्ण महत्व असलेली स्थळे विकसित करून पर्यटन वाढिस चालना देणे,यासाठी श्री.निकम सरांचे नेहमीच प्रयत्न चालू असतात. राजवाडी येथील गरम पाण्याचे कुंड हे संगमेश्वर तालुक्यातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. या कुंडाला शासनाच्या पर्यटन योजनेंतर्गत त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. राजवाडी येथील गरम पाण्याच्या कुंडाचे सुशोभिकरणाचे काम सुरू झाल्याने या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना एक भव्य व आकर्षक अनुभव मिळेल.त्याच बरोबर या कुंडाचे सुशोभिकरण काम पूर्ण झाल्यानंतर येथील पर्यटनाला अधिक चालना मिळेल आणि यामुळे रोजगाराच्या संधींमध्ये नक्कीच वाढ होईल असे आमदार शेखर निकम यांनी यावेळी सांगितले.